You are currently viewing वेंगुर्ल्यात सागरी सुरक्षा रक्षक दल आढावा बैठक

वेंगुर्ल्यात सागरी सुरक्षा रक्षक दल आढावा बैठक

वेंगुर्ले :

तालुक्यातील सागरी सुरक्षा रक्षक दल आढावा बैठक शनिवारी पोलीस स्थानकात संपन्न झाली. यावेळी पावसाळ्याच्या अनुषंगाने सागरी सुरक्षेबाबत चर्चा करण्यात आली. किनारपट्टी भागातील सागरी सुरक्षेबाबत पावसाळ्यात उद्भवणार्‍या धोकादायक परिस्थिती बाबत सतर्क राहण्याची, तशीच आवश्यक ती दक्षता घेण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांनी केले.

यावेळी या बैठकीस योगेश तांडेल, सूर्यकांत गावकर, सुहास तोरसकर परेश मलबारी, फर्नांडिस, जगन्नाथ खवणेकर, संतोष साळगावकर, घनश्याम तोरसकर, विष्णू पेडणेकर गजानन कुबल, मनोहर साळगावकर, तुकाराम तोरसकर, मनोज परुळेकर आदी सागरी सुरक्षा रक्षक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 3 =