You are currently viewing सावंतवाडी नंबर 2 चा विद्यार्थी कु.सोहम सुधीर गावडे याची जवाहर नवोदय विद्यालय (सांगेली सावरवाड) येथे गुणवत्तेनुसार निवड

सावंतवाडी नंबर 2 चा विद्यार्थी कु.सोहम सुधीर गावडे याची जवाहर नवोदय विद्यालय (सांगेली सावरवाड) येथे गुणवत्तेनुसार निवड

*सावंतवाडी नंबर 2 चा विद्यार्थी कु.सोहम सुधीर गावडे याची जवाहर नवोदय विद्यालय (सांगेली सावरवाड) येथे गुणवत्तेनुसार निवड*

सावंतवाडी

जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा जानेवारी 2024 मध्ये कै. सुधाताई वा. कामत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर 2 चा विद्यार्थी कु. सोहम सुधीर गावडे याची जवाहर नवोदय विद्यालय (सांगेली सावरवाड) येथे गुणवत्तेनुसार निवड झाली आहे. त्याला वर्गशिक्षिका भक्ती फाले मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. ढवळ मॅडम पाटील सर ,ठाकूर मॅडम, सावंत मॅडम, शिरसाट मॅडम तसेच शाळेच्या माजी मुख्याध्यापिका चैताली गवस मॅडम यांचे सहकार्य लाभले. सोहमला त्याचे काका सुहास गावडे सर, वडील सुधीर गावडे सर व आई साक्षी गावडे यांचेही मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. सावंत व सर्व पदाधिकारी, माजी केंद्रप्रमुख श्रीम.लंगवे मॅडम, सावंतवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. कमलाकर ठाकूर साहेब, गटशिक्षणधिकारी सावंतवाडी श्रीम.कल्पना बोडके मॅडम व गटविकास अधिकारी सावंतवाडी श्री.वासुदेव नाईक साहेब यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. चौकुळ-आंबोली पंचक्रोशीतून तसेच सावंतवाडी शहरातून सोहमने शाळेचे नाव उज्वल केल्याबद्दल अभिनंदन व कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा