You are currently viewing भाऊ आजगावकर गुरुजींची ‘ श्यामची आई’ पुस्तकाने अनोखी ग्रंथतुला

भाऊ आजगावकर गुरुजींची ‘ श्यामची आई’ पुस्तकाने अनोखी ग्रंथतुला

सावंतवाडी :

जिल्हा परिषद शाळा केरवाडा, शिरोडा (ता. वेंगुर्ला) येथे उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदावर कार्यरत असणारे त्रिंबक अंकुश आजगावकर उर्फ भाऊ गुरुजी नियत वयोमानानुसार ३१ जानेवारी २०२४ रोजी सेवानिवृत्त झाले.

यावर्षी महाराष्ट्र माऊली साने गुरुजींचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्म वर्ष साजरा करीत असल्याने भाऊ आजागावकर गुरुजी यांची नुकतीच साई मंगल कार्यालय, वेंगुर्ला येथे आजगावकर कुटुंबीयांकडून ग्रंथ तुला करण्यात आली. यासाठी ‘श्यामची आई’ हा ग्रंथ निवडण्यात आला होता.

दरम्यान ‘श्यामची आई’ पुस्तकाच्या ग्रंथतुलेमुळे गुरुजींच्या ज्ञानदानाला एक प्रकारे अनोखा सलाम करण्यात आला.

सदर ग्रंथतुला कार्यक्रमास माजी आमदार शंकर कांबळी, माजी सभापती जयप्रकाश चमणकर, सेवानिवृत्त शिक्षक सत्यवान पेडणेकर गुरुजी, रेडीवासीय श्री. मंगेश कामत, सिद्धेश जोशी, रामचंद्र (दादा) नाईक, यांसह शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

ग्रंथतुलेचा पाया छोटे बालचमू दिव्यश्री पाटकर व सावी नार्वेकर यांनी रचला. तर तुलेचा कळस भगवद्गीतेने भाऊ आजगावकर यांच्या सौभाग्यवती व मुख्याध्यापिका देवयानी आजगावकर यांनी केला.

यावेळी माजी आमदार शंकर कांबळी म्हणाले, त्रिंबक उर्फ भाऊ आजगावकर गुरुजी यांनी आपल्या जीवनात अनेक आदर्श विद्यार्थी निर्माण केले. रात्रंदिवस फक्त ‘विद्यार्थी आणि शाळा’ यासाठीच गुरुजी अविरत झटले. अलीकडच्या काळात गुरुजींसारखे व्यक्तिमत्व फार कमी प्रमाणात पहावयास मिळतात. म्हणून गुरुजींच्या कार्याचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक व्यवस्थेला नेहमीच अभिमान राहील, असे गौरवोद्गार श्री. कांबळी यांनी काढले.

जयप्रकाश चमणकर म्हणाले, ‘श्यामची आई’ पुस्तकाने गुरुजींची ग्रंथतुला ही अतिशय योग्य असून वाचन संस्कृती वाढीस लागण्यासाठी गुरुजींचं हे कार्य प्रेरणादायी आहे.

साने गुरुजी कथामाला मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनीही मुख्याध्यापिका श्रीमती देवयानी आजगावकर आणि कुटुंबीयांचे या ग्रंथतुलेबद्दल अभिनंदन केले व वाचन संस्कृती वाढीसाठी गुरुजींचा हा प्रयत्न घराघरात जावा, अशा सदिच्छा व्यक्त केल्या.

आजगावकर कुटुंबीय यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven − two =