You are currently viewing पावशी येथे आम. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

पावशी येथे आम. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

कुडाळ/ पावशी :

 

आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आज गुरुवार दि. २३ मार्च रोजी पावशीत शिवसेना पावशी व समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पावशी शिवसेनेच्या वतीने रक्तदात्यांना २ लाखाचे विमाकवच उतरवले जाणार आहे. तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन माजी सरपंच बाळा कोरगांवकर यांनी केले आहे. हे रक्तदान शिबिर सकाळी ८-३० वाजता पावशी येथील शातादुर्गा मंगल कार्यालय पावशी येथे घेण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 − three =