You are currently viewing महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघाची कणकवली तालुका कार्यकारणी जाहीर!

महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघाची कणकवली तालुका कार्यकारणी जाहीर!

मालवण

महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघाची 2022 ते 2025 साठीची कार्यकारिणी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री संतोष जाधव व जिल्हाध्यक्ष श्री शिवाजी पवार यांच्या उपस्थितीत निवड करून जाहीर करण्यात आली. सदर कार्यकारणी तीन वर्षासाठी असेल. सर्व सभासदांच्या सर्वानुमते ही कार्यकारिणी तयार करण्यात आली.

सदर कार्यकारणी पुढील प्रमाणे.अध्यक्ष श्री संजय आप्पान्ना पवार केंद्रप्रमुख कासार्डे, उपाध्यक्ष श्री काळू मंगल पवार केंद्रप्रमुख जानवली,कार्याध्यक्ष श्री नारायण कोटकर केंद्रप्रमुख पियाळी, सचिव श्री सुरेश हरकुळकर केंद्रप्रमुख बोर्डवे,सहसचिव श्री राजेंद्र प्रसाद मणेरीकर केंद्रप्रमुख कळसुली, कोषाध्यक्ष श्री सुभाष महाले केंद्रप्रमुख बोर्डवे,
सहकोषाध्यक्ष श्री. सुर्यकांत चव्हाण केंद्रप्रमुख फोंडाघाट, महिला प्रतिनिधी श्रीमती शुभांगी दळवी केंद्रप्रमुख कणकवली, सल्लागार श्री विजय मसुरकर केंद्रप्रमुख नरडवे, सल्लागार श्री गोपाळ जाधव केंद्रप्रमुख साळिस्ते, जिल्हा संपर्कप्रमुख श्री सदगुरू कुबल केंद्र खारेपाटण. सर्व कार्यकारणी सदस्यांना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री संतोष जाधव व सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष श्री शिवाजी पवार यांनी यशस्वी कार्य कीर्ती साठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. सर्व कार्यकारिणी सदस्यांनी सर्वांना विश्वासात घेऊन काम करण्याची मनोकामना व्यक्त करून सर्वांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा