You are currently viewing गावाशी जोडलेली नाळ जपणारा माणूस

गावाशी जोडलेली नाळ जपणारा माणूस

*गावाशी जोडलेली नाळ जपणारा माणूस*

काही माणसं अशी असतात जी आपली आपल्या जन्मभूमीशी जोडलेली आपली नाळ कधीच तोडत नाहीत. आपला गाव मुलुख सोडून कर्तुत्वासाठी दूर देशी जातात. परंतु गावाला मात्र कधीच विसरत नाहीत. स्वतः मोठी झालेली ही माणसे आपल्या सोबत आपल्या गावातील आपला सवंगडी व त्याची मुले बाळे मोठी व्हावी यासाठी कार्यरत असतात. अर्थात अशी माणसं दिसायला दुर्मिळ असतील पण ती इतरांच्या मनाच्या कोपऱ्यात आपलं एक अढळ स्थान निर्माण करताना आणि एव्हर रिमेम्बरिंग होऊन जातात.

अशीच एक सुंदर व्यक्ती आमची होऊन गेली आणि आमच्या मनपटलावर कायमस्वरूपी कोरली गेली. नुकतीच आमच्या वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तळेरेची 120 विद्यार्थी असलेली व सोबत 12 शिक्षकांची सहल पुणे, सिंहगड ,शनिवारवाडा, लालमहाल, दगडूशेठ गणपती मंदिर करून शिवनेरी येथे जाण्यापूर्वी आळंदी या ठिकाणी मुक्कामी गेली. एवढ्या विद्यार्थ्यांसह आळंदीत पोहोचलेल्या या लवाजमाची खबर पुणे- चिंचवड येथे कार्यरत असलेले सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष श्री अजयजी पाताडे यांच्या कानापर्यंत पोहोचली. माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची सहल आहे, त्यांना भेटलेच पाहिजे या निर्मळ हेतूने अजयजी पाताडे आपल्या सर्व कार्यकर्त्यांसह सहलीच्या निवासस्थानी पोहोचले. श्री अजयजी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मिळून सहल सिंधुदुर्गातील जिल्ह्यातील आहे, माझ्या जिल्ह्याची आहे या उद्देशाने सर्व शिक्षकांचा अगदी बाराही शिक्षकांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार सन्मान केला. सहलीच्या गाडी सोबत आसलेले सर्व तीनही चालकांचा देखील शाल व श्रीफळ देवून सत्कार केला. सहलीतील 120 विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रतीचा पेन, बिस्किट पुडा व ज्यूसचा ट्रेट्रापॅक दिलाच शिवाय जीवनाच्या वाटेवर सचोटीने आणि प्रामाणिकपणे मार्गस्थ झाल्यास यश कधीच दूर नाही असे बाळकडू आपल्या मधुर वाणीने विद्यार्थ्यांना देऊन शुभेच्छा दिल्या. एवढेच नाही तर मुले सहली दरम्यान दुसऱ्या दिवशी भुकेली राहतील यासाठी विद्यार्थ्यांच्या चहापान व न्याहारी खर्चासाठी पाच हजार रुपये दिले. माझ्या शिक्षकांच्या आयुष्यातील सन्मानाचा हा फार सुंदर प्रसंग होता. सर्व शिक्षकवर्ग भारावून गेला. यातील कोणतीच गोष्ट ध्यानीमनी नसताना अगदी सहज आळंदी सारख्या मंगलमय स्थळी अनपेक्षित घडली. हा कार्यक्रम सर्वांच्या मनावर अगदी कायमस्वरूपी कोरला गेला.

अवकाशाला गवसणी घालण्यासाठी पंखात बळ असावे लागते तसेच मला पुन्हा जमिनीवर उतरायचे आहे याचं भान देखील असावं लागते. अर्थात अवकाशाला गवसणी तेच घालू शकतात ज्यांचे पाय जमिनीवर घट्ट रोवलेले असतात. स्व-प्रगतीसाठी गाव सोडला पण गावाशी जोडलेली नाळ मात्र तोडली नाही. श्री अजयजी पाताडे यांचा जन्म कणकवली तालुक्यातील कासार्डे या गावातील, त्यांचे वडील गिरणी कामगार होते. ते देखील मुंबईत असले तरी त्यांची गावाशी असलेली नाळ त्यांनी घट्ट ठेवली होती. परंतु 1982 मध्ये ऐतिहासिक संप झाला. गिरणी कामगार देशोधडीला लागले. अजयजींच्या वडिलांनी गावाची वाट धरली. रोजगाराचा प्रश्न बिकट होता. अशावेळी अजयजीची आई मात्र हिमतीने उभी राहिली. तीन मुलगे आणि दोन मुली अशा आपल्या मुलांच्या संगोपनासाठी पडेल ते काम त्या माऊलीने स्वीकारले. भाकरीची सोय आईने केली. परंतु भाकरी हातात देत असतानाच संस्काराची शिदोरी द्यायला ती माऊली कधीच विसरली नाही. त्यामुळेच तर ‘ माझ्या हातात भाकरी आहे तशीच ती इतरांच्या हातात देखील असायला हवी ‘ या वृत्तीने अजय पाताडे आजही कार्यरत आहेत. भुकेचे चटके त्यांनाच कळतात ज्यांना भुकेची झळ बसलेली असते. क्षुधाशांतीसाठी प्रसंगी अजय पाताडे यांना जांभळाची टोपली उपयोगी पडली. त्यातून भूक क्षमवायची आणि अर्थप्राप्ती सुद्धा होत असे.

श्री अजय पाताडे यांचे आभार मानण्यासाठी मी त्यांच्या सोबत फोनवरून संवाद साधला. आमच्या गप्पा-टप्पा चालू असतानाच, मी त्यांना प्रश्न केला की कासार्डे गावातील आपले बालपण कसे गेले? माझ्या प्रश्नावर मात्र ते थोडे भावूक झाले आणि बोलू लागले. ” गिरणी कामगारांच्या संपामुळे होरपळून गेलेले आमचे कुटुंब मुंबई लालबाग येथून मूळ गावी स्थलांतरित झाले. पोटापाण्याचे इतर कोणते साधन नव्हते. आई आणि वडील या दोघांनी दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करून कष्टाने आम्हाला जगायला शिकवले. मोठा भाऊ बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी पुणे येथे नातेवाईकांकडे राहून दिवसा काम व रात्री कॉलेज करीत होता. दोन नंबरचा भाऊ प्रकाश हा घर सांभाळत होता.आमच्यापेक्षा लहान दोन बहिणी मीना व छाया यांचे शिक्षण आणि घरखर्च भागवणे फार कठीण संकट आमच्या कुटुंबावर होते. त्यावेळी मी सातवीत होतो. मी सुरंगीचे हार बनवून घरोघरी विकत असे. उन्हाळ्यात तर रायवळ आंबे, फणस, जांभळे टोपलीत भरून तरळे बसस्टॅण्ड वर विकून घर खर्चासाठी आर्थिक हातभार लावण्याचा प्रयत्न करीत होतो. या परिस्थितीत मी माझे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. अकरावी- बारावीत असताना एका परमिट रूम मध्ये पार्ट टाइम जॉब केला. बारावीनंतर मी सुद्धा नोकरी धंद्याच्या शोधात पुणे येथे आलो. भोसरी एम आय डी सी मध्ये कुरियर कंपनीत सायकल वरून पत्र वाटप केले. संपाच्या तडजोडीमुळे वडीलांना काही पैसे मिळाले होते. त्यातून एक व्हिडिओ खरेदी केला. दिवसा हंगामी व्यवसाय तर रात्री व्हिडिओ लावून लावणे असे काम मी करू लागलो. कालांतराने फोटोग्राफी शिकलो. त्यानंतर स्वतःचा अजय फोटो स्टुडिओ सुरू केला. पुढे डिजिटल प्रिंटिंग क्षेत्रातील ज्ञानग्रहण केले. आम्ही पाच मित्रांनी एकत्र येऊन फ्लेक्स प्रिंटिंग क्षेत्रात व्यवसाय सुरू केला. आज ट्रू व्हिजन हे माझे स्वतःचे फ्लेक्स प्रिंटिंग युनिट सुरू आहे. सांगण्यास मला आनंद वाटतो की कॉलेजमध्ये असताना मी हॉटेलमध्ये काम करत होतो. त्यावेळेस एक स्वप्न पाहिले होते ते मी आज पूर्ण करू शकलो, आज *आरंभ* रेस्टोबार हे माझे हॉटेल शहरांमध्ये सुरू आहे.” हे सर्व सांगत असतानाच अजयजींचा आवाज जाड झाला होता. फोन वरूनही त्यांच्या डोळ्यांच्या पापण्या पाणवल्याचे मला जाणवत होते.

असा हा जीवन संघर्ष सुरू असतानाच, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन अजय पाताडे यांनी शिवसेना शाखाप्रमुख, विभाग प्रमुख, पुढे पिंपरी- चिंचवड शहराचा विद्यार्थी सेनेचा शहराध्यक्ष अश्या अनेक पदांवर युतीच्या काळात वीस वर्ष राजकीय क्षेत्रात शिवसेनेमध्ये काम केले. त्यानंतर 2011 पासून भारतीय जनता पार्टीमध्ये आज पिंपरी -चिंचवड शहर जिल्हा सरचिटणीस या पदावर कार्यरत आहेत. त्याचबरोबर कोकण विकास महासंघ सदस्य, जनकल्याण प्रतिष्ठान अध्यक्ष, राष्ट्रतेज मित्र मंडळ अध्यक्ष, पिंपरी पोलीस स्टेशन शांतता कमिटी सदस्य यासारख्या पदांवर ते कार्यरत आहेत. महिला बचत गट फंड याच्या माध्यमातून महिलांसाठी पीठ गिरणी, कापडी बॅग शिवणे, पत्रावळी व द्रोण बनविणे असे छोटे -मोठे व्यवसाय सुरू करून महिलांना स्वयंपूर्ण बनविण्यात अजय पाताडे यांचा मोलाचा सहभाग आहे. यातूनच दीनदुबळ्या, गरीब, गरजू व्यक्तींना आधार देऊन त्यांचे अश्रू पुसण्याचे काम अजय पाताडे करीत आहेत.

श्री अजय पाताडे गेली 13 वर्षे सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष या नात्याने कार्यरत आहेत. गुणवंत विद्यार्थी गौरव, जेष्ठ नागरिक गौरव यासारख्या उपक्रमासोबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उपक्रमशील शाळेचा गौरव पुणे चिंचवड या ठिकाणी बोलावून सन्मानपूर्वक दरवर्षी करत असतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होतकरू युवकांसाठी नेहमीच सहकार्याचा हात देत असतात. 25 टक्के राजकारण आणि 75 टक्के समाजकारण हा अजयजीनी घेतलेला वसा आहे. ” सिंधुदुर्ग हा माझा जिल्हा आहे, या जिल्ह्यातून कोणताही युवक पुणे येथे शिक्षणासाठी येत असेल तर त्यासाठी आम्ही नक्कीच मदतीचा हात पुढे करू, तुम्ही हाक द्या आम्ही हात देऊ”, असे अजय पाताडे अभिमानाने सांगतात. सिंधुदुर्ग मधील होतकरू युवकांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मोलाचे सहकार्य अजय पाताडे यांनी दिले आहे.

” मी आज उभा आहे तो माझ्या मोठ्या भावामुळेच, त्यांनीच आम्हाला मोठं केले” , अजयची स्वतः पुढे जाण्याचे सर्व श्रेय आपल्या मोठा भाऊ संजय पाताडे यांनाच देतात. आपल्या सर्व भावंडांबद्दल खूप आस्थेने आणि प्रेमाने आजही बोलतात. यातूनच अजय पाताडे यांची उंची दिसून येते.

विंदांच्या एका कवितेतील पंक्ती अश्या आहेत, *देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे.* अगदी याच पंक्तीप्रमाणे आम्ही आपलं वर्तन ठेवून आपणसुध्दा कधीतरी अजयजींच्या दातृत्वाचे हात घ्यायला शिकले पाहिजे. अजयजी! आपल्या दातृत्वाला आमचा नेहमीच सलाम

*—- अविनाश मांजरेकर —*
वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तळेरे, कणकवली

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

.

प्रतिक्रिया व्यक्त करा