You are currently viewing महाराष्ट्र शिक्षक पॅनल कडून श्री. अंकुश नथुराम जाधव (निवी रोहा) यांची सेवा सन्मान राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारा साठी निवड

महाराष्ट्र शिक्षक पॅनल कडून श्री. अंकुश नथुराम जाधव (निवी रोहा) यांची सेवा सन्मान राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारा साठी निवड

 

निवी गावचे सुपुत्र श्री अंकुश नथुराम जाधव हे शामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष श्री.सतीश मोहन पाटील यांच्या “न्यू इंग्लिश स्कूल कळंबोली” विद्यालयात गेली १६ वर्षे कार्यरत आहेत. विविध संस्थांकडून 9 वेळा आदर्श शिक्षक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे .

अंकुश जाधव हे एक दिव्यांग शिक्षक असून अत्यंत बुद्धिमान, प्रामाणिक, कष्टाळू व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांचे शैक्षणिक, सामाजिक, संस्कृती कार्य खरोखरच उल्लेखनीय, प्रशन्सनीय आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन “श्री साई प्रतिष्ठान पुणे”, राष्ट्रीय काव्यांगण लेखणीचे साहित्य मंच तथा सामाजिक संघटना, आणि राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था आणि श्री राजपूत करणी सेना जळगाव आदी सामाजिक संस्थांनी आदर्श शिक्षक पुरस्कारानी गौरवीले आहे.

आज त्यांच्या शैक्षणिक, प्रशासकीय, गुणवत्तापूर्ण सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल व शाळेतील विविध उपक्रमांची दखल घेऊन महाराष्ट्र शिक्षक पॅनल निवड समितीच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आला असून या पुरस्कार निवडीचे पत्र नुकतेच महाराष्ट्र शिक्षक पॅनलच्या वतीने रायगड जिल्हा विभाग निवड समितीचे सदस्य श्री सुरेश भगवान शिंदे यांनी अंकुश जाधव यांस दिले.

अंकुश जाधव यांच्या नावावर आजपर्यंत आदर्श शिक्षक, वृक्षमित्र, काव्यभूषण, ज्ञानभूषण, समाजरत्न, शिक्षकरत्न, कविभूषण, समाजभूषण ,उत्कृष्ट निवेदक असे अनेक पुरस्कार आहेत.

आज महाराष्ट्र शिक्षक पॅनलने सेवासन्मान आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी केलेली निवड त्यांच्या गुणगौरवात मानाचा शिरपेच चढवते.

ते त्यांच्या उत्कृष्ट अध्यापन शैलीने विद्यार्थीवर्गात प्रिय शिक्षक आहेत.आज त्यांच्यावर सर्व स्थरातून, सहकारी अध्यापक वृंद, त्यांचे लाडके विद्यार्थी, पालक, मित्र परिवार, निवी ग्रामस्थ, नातेवाईक यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे . कौतुक होत आहे. त्यांच्या भावी कार्यास भरभरून शुभेच्छा देत आहेत.

सलाम त्यांच्या कार्याला आणि त्यांचा गुणगौरव करणाऱ्या “महाराष्ट्र शिक्षक पॅनलला”. त्यांच्या पुढील वाटचालीस आमच्याकडूनही हार्दिक शुभेच्छा!

नुकतेच जगभर गाजत असलेल्या जागतिक साहित्य कला व्यक्ती विकास मंच समूहात त्यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. जागतिक साहित्य कला व्यक्ती विकास मंच समूह संस्थापक श्री. पांडुरंग कुलकर्णी व समूह सदस्यांकडून त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

 

विलास कुलकर्णी

7506848664

जन संपर्क अधिकारी

जागतिक साहित्य कला व्यक्ती विकास मंच समूह

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 − 1 =