You are currently viewing शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूर तिठा प्रशालेचा १०० टक्के निकाल

शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूर तिठा प्रशालेचा १०० टक्के निकाल

कु. कृष्णकांत अटकेकर ला ९८.८०% प्रथम क्रमांक तर कु. पियुषा सावंत (९७.००%) द्वितीय क्रमांक प्राप्त

 

पणदूर / कुडाळ :

 

शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूर तिठा या प्रशालेचा १०० टक्के निकाल लागला आहे. एस. एस. सी. परीक्षेत एकूण १५६ विद्यार्थी बसले होते.

१० वी च्या या परीक्षेत प्रथम क्रमांक कु. कृष्णकांत अटकेकर (९८.८०%) (४९४ गुण), द्वितीय क्रमांक कु. पियुषा सावंत (९७.००%) (४८५ गुण) आणि तृतीय क्रमांक कु. सेजल सुर्वे (९५.००%)(४७५ गुण) तर चौथा क्रमांक कु. जिनिषा सावंत (९४.४०%) (४७२ गुण), पाचवा क्रमांक कु. आर्या तेरसे (९४.२०%) (४७१ गुण) यांनी यश संपादन केले आहे.

तसेच कृष्णकांत अटकेकर याला संस्कृत आणि गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले आहे. यश संपदान केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्था चेअरमन श्री शशिकांत आणावकर, संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा