You are currently viewing प्रसाद राणे यांना गुरुसेवा सन्मान पुरस्कार प्रदान

प्रसाद राणे यांना गुरुसेवा सन्मान पुरस्कार प्रदान

कणकवली

शालेय शिक्षणमंत्री नाम.दीपक केसरकर यांच्या हस्ते विद्यामंदिर हायस्कूलचे
कलाशिक्षक प्रसाद राणे यांना गुरुसेवा सन्मान पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
प्रसाद राणे हे गेली २० वर्षे विद्यामंदिर हायस्कूलमध्ये कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांकरिता ते सतत विविध उपक्रम राबवित असतात. त्यांचे अनेक विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धांमध्ये जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले आहे. याशिवाय सामाजिक पातळीवर लगद्यापासून पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची निर्मिती, पारंपरिक आकाशकंदील, कापडी पिशव्यांचीनिर्मिती, प्लास्टिक कचरा एकत्रीकरण, नैसर्गिक रंगांची रंगपंचमी, निर्माल्य एकत्रीकरण, कचऱ्यापासून
कलानिर्मिती, व्यसनमुक्ती विषयी जनजागृती यासह विविध उपक्रम ते राबवित आहेत. त्यांना आजपर्यंत विविध संस्थांचे राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार
मिळाले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन ना. दीपक केसरकर मित्रमंडळाने यंदाचा गुरुसेवा सन्मान पुरस्कारासाठी निवड केली होती. मंत्री केसरकर यांच्या सावंतवाडी येथील निवासस्थानी शनिवारी शालेय शिक्षणमंत्री दीपक
केसरकर यांच्या हस्ते प्रसाद राणे यांना शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन त्यांना गुरुसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रसाद राणे
यांना मिळेलल्या पुरस्काराबद्दल त्यांचे शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, सचिव विजय वळंजू मुख्याध्यापक बी. डी. सरवदे, पर्यवेक्षक पी.
जे. कांबळे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा