You are currently viewing सैनिकांचा सन्मान, जे आहेत देशाची शान

सैनिकांचा सन्मान, जे आहेत देशाची शान

*पत्रकार, लेखिका सौ.मेघा कुलकर्णी (मेघनुश्री) लिखित अप्रतिम लेख*

 

*“सैनिकांचा सन्मान, जे आहेत देशाची शान”*

 

नुकताच अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा केला गेला. प्रत्येक भारतीय या सुवर्णक्षणाचा साक्षीदार बनला. देशप्रेमाने भरलेले ओतप्रोत मन, सैनिक बनण्याची प्रबळ इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रमानंतर झालेली निवड ही कुटुंबियांचीच नाही, तर संपूर्ण गावाचा अभिमान बनते. मान उंचावणाऱ्या या क्षणाची वाट पाहणाऱ्या पालकांच्या डोळ्यांत अश्रू तरळतात. पाठीवर मिळणाऱ्या शाब्बासकीने पुढचा प्रवासही आनंदाचा ठरतो. “अहोरात्र भारतीय सैन्याचा सन्मान, सैनिकांचे कर्तुत्व ही आयुष्यभराची जाण” बेसुमार ऊन, मुसळधार पाऊस, हाडे गोठवणारी थंडी, बर्फाळ प्रदेश किंवा दुसरे टोक म्हणजे समुद्रकिनाऱ्या वरील वास्तव्य, याच सोबत होणारे ऋतुतील बदल अंगावर झेलायचे ते देशप्रेमाखातर. अष्टौप्रहर खडा पहारा, देशाच्या रक्षणाची जबाबदारी, कर्तव्य आणि धाडस, पराक्रमाची परिसीमा, हे सर्व एकवटते तेव्हां देशसेवेसाठी सैनिक तयार होतो. कोणताही सण, समारंभ, कौटुंबिक सुखाचे क्षण, दुखा:चे डोंगर पचवत महिनोंमहिने कुटुंबापासून दूर अंतरावर राहावे लागते, निधड्या छातीने शत्रूला नामोहरम करणे हे ध्येय उराशी बाळगले जाते. “माणूस म्हणून जगण्यासाठी विचार हा अनमोल ठेवा, सैनिकांच्या कृतार्थतेसाठी प्रत्येकाच्या हृदयांत दिवा” छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्धकौशल्य आणि त्यासाठी उभे असलेले आरमार अविस्मरणीय आहेच. कोणतीही कठीण परिस्थिती हाताळताना, सैन्यदल, वायुदल आणि नौदल आपापल्या परीने शर्थीचे प्रयत्न करत प्राणपणांस लावतात, तेव्हां आपण घरी, शहरांत आणि राज्यांत सुरक्षित असतो. भारतमातेसाठी प्रांता-प्रांतातील विविधता जपत, ध्येयपूर्ती साठी अखंड, अविरत पणे लढा देणाऱ्या शूरांना सदैव वंदन करत सैनिकबांधवांना बळ सामर्थ्य लाभो ही भारतमातेचरणी प्रार्थना. “मिनिटांची नसते शाश्वती, तरीही सीमेच्या रक्षणासाठी अग्रेसर, तुफानी आयुष्याला देऊ सलामी, मनांपासून जोडून दोन्ही कर.” जय हिन्द.

 

मेघनुश्री (लेखिका,पत्रकार)

भ्रमणध्वनी : ७३८७७८७५१२

 

*संवाद मिडिया*

 

*फणस प्रक्रिया प्रशिक्षण – अभिनव उद्योग प्रबोधिनी*

 

*Advt Link👇*

————————————————

*कोकणवासियांनो उठा, जागे व्हा*

*सुवर्णरुपी फणसाचे मूल्य ओळखा*

 

*ॲनी* नामक कोण एक *अमेरिकन* महिला भारतात येते, तिची *नजर* फणसावर जाते, बाहेरून काटेरी पण आतून मऊ, मधूर गरे असलेल्या फळाच्या *प्रेमात* पडते, त्यावर *अभ्यास* करते आणि त्याचे विविध गुणधर्म पाहून *अचंबित* होत *करोडो रुपयांची* कंपनी उभी करते.

 

खरोखरच अचंबित करणारी ही घटना आहे. 10-12 वर्षापूर्वी भारतात आलेल्या ॲनी ने फणसाचे व्यावसायीक महत्व ओळखून *द जॅकफ्रूट कंपनी* (The Jackfruit Company) नावाने अमेरिकेतील बोल्डर, कोलोरॅडो शहरात मोठा व्यवसाय उभारला आहे. आज करोडो रुपयांची उलाढाल ही कंपनी करत असून जवळपास 175 करोड रुपयांचं फंडींग या कंपनीला मिळालं आहे. विशेष म्हणजे भारतातून मोठ्या प्रमाणात या कंपनीला फणसाचा पुरवठा होत आहे.

 

*साईराज धोंड* नामक गोव्यातील तरूण *Wakao Foods* नावाचा ब्रॅण्ड तयार करून फणसाचे valu added प्रॉडक्ट्स बनवून देशभरात sale करत आहे.

 

आज जगभरात फणसाला *ग्लोबल फ्रूट* म्हणून संबोधण्यात येत आहे आणि जास्तीत जास्त प्रमाणात फणसाचा समावेश *दैनंदीन आहारात* केला जात आहे.

 

भारतामध्ये केरळ, आंध्र, तामिळनाडू, कर्नाटक राज्यात बऱ्याच प्रमाणात फणसावर काम केले जात आहे, फणसाचा वापर करण्यात येत आहे. *जोसेफ* नामक व्यक्तीने *जॅकफ्रूट 365* नामक कंपनी उभारत फणसाच्या प्रक्रिया व्यवसायावर लक्ष केंद्रित केले आहे.

 

कोकणात मात्र आजही फणसाच्या बाबतीत उदासीनता दिसून येते. जवळपास 85 ते 90 टक्के फणस वाया जात आहे. कोकणवासियांनी वेळीच सावध होत त्यावर पावले उचलण्याची गरज आहे.

 

*मधुमेह, रक्तदाब, कर्करोग, दमा, नेत्र रोग, त्वचा विकार यासारख्या अनेक आजारांवर फणस उपयुक्त असल्याचे सिध्द होत आहे.*

 

वेगवेगळ्या माध्यमातून फणसाचा आहारात वापर करणे शक्य असल्याने फणसाचे महत्व अधिकच अधोरेखित होत आहे.

 

वेगवेगळ्या पद्धतींनी आणि विविध स्वरुपात वर्षभर टिकणारे, वापरता येऊ शकणारे फणसाचे प्रॉडक्ट्स बनवता येत असल्याने *फणस प्रक्रिया व्यवसाय* आर्थिक उन्नतीचा एक नवा स्त्रोत ठरणार आहे.

 

फणसाचे भविष्यातील महत्व ओळखून लांजा येथील *हरिश्चंद्र देसाई* यांनी 84 पेक्षा जास्त जातीची 1500 झाडांची *फणस बाग* तयार केली आहे. देसाई पिता पुत्र फणसावर मोठ्या प्रमाणात जागृती करत असून त्यावर काम करत आहेत.

 

*अभिनव उद्योग प्रबोधिनी* पण कोकणातील वाया जाणारा फणस जास्तीत जास्त उपयोगात यावा, त्यापासून मूल्यवर्धित प्रॉडक्ट्स तयार करणारे उद्योजक, व्यावसायीक घडावेत आणि कोकणात आर्थिक उन्नती व्हावी, उद्योग व्यवसाय उभे राहावेत यासाठी प्रयत्नशील आहे.

 

*अभिनव उद्योग प्रबोधिनी* यासाठीच *फणस प्रक्रिया प्रशिक्षण* शिबिराचे आयोजन वेळोवेळी करत असते. यंदाही *9-10-11 फेब्रुवारी* रोजी *कुडाळ* येथे हे 3 दिवसीय प्रशिक्षण शिबिर संपन्न होणार आहे.

 

प्रात्यक्षिकासह सखोल मार्गदर्शन या प्रशिक्षणात करण्यात येत असल्याने प्रशिक्षणार्थीना त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो, प्रक्रिया समजते, शंकांचं निरसन होतं आणि त्याचा गंध, चव समजल्याने त्यातील विविध पर्याय, संधी यांचा अंदाज येतो.

 

प्रशिक्षण संदर्भात अधिक माहितीसाठी कृपया *Jack* असा व्हॉट्स ॲप मेसेज 8767473919 या क्रमांकावर पाठवा.

 

*फणस प्रक्रिया प्रशिक्षण*

*9-10-11 फेब्रुवारी 2024*

*कुडाळ, सिंधुदुर्ग*

 

*टीम अभिनव*

8767473919

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − four =