You are currently viewing भूतांखेतांच्या गोष्टी

भूतांखेतांच्या गोष्टी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम कथा*

 

*भूतांखेतांच्या गोष्टी*

( क्रमांक ९ वा )

————————-

साऱ्या ब्रह्मांड सृष्टित ,साऱ्या चराचरात जशा चांगल्या (मंगल) गोष्टि आहेत तशा अनिष्ट ( अमंगळ ) गोष्टि आहेत . हे सर्वश्रुत आहे . अनादिकाला पासून या गोष्टी सुरु आहेत हे प्रकर्षाने जाणवते . प्राचीन धर्मग्रन्थातुन , प्राचीन वांग्मयातून , कथा मधून याचा उल्लेख आहे. भूते ही सर्व सामान्य माणसा सारखी नसतात , विरूप , विद्रुप असतात , कुणाला कान नाहीत, हात नाहीत , तर कुणाला पाय नाहीत , डोळे नाहीत , उलटे पाय , हाडांच्या सापळ्या सारखी भूते असतात असे वर्णन अनेक कथातून झालेले आहे असे दिसून येते भूते कुणाचेही रूप घेवू शकतात ..उलटी चालू शकतात , कशाही उड्या मारू शकतात . झाडावर ,खांबावर उलटे पालटे चढू शकतात ..अनेक विक्षिप्त अंगविक्षेप करु शकतात . हे पाहतांना असतांना सर्वसामान्य माणसाना या गोष्टी भीतिदायक ,ओंगळ दिसतात , माणसाची भीतिने गाळण उड़ते , अंगावर काटे येतात हे खरे आहे ..या गोष्टि आजही क्षेत्राच्या ठिकाणी पहाण्यास मिळतात . श्रीक्षेत्र गाणगापूर (दत्तधाम) येथे या गोष्टी आजही पहाण्यास मिळतात . या गोष्टिवर विश्वास ठेवायचा कां नाही हा ज्याचा त्याच्या वैयक्तिक प्रश्न आहे …

पूर्वी एका गावात ६०/६५ वर्षापूर्वी एक वेदमुर्ती दशग्रन्थि ब्राह्मण होते , वेदांत पाठशाळा चालवित असत . अनेक विद्यार्थी तिथे शिकावयास होते . गुरुकुल पद्धतीमुळे ते विद्यार्थी तिथे रहात असत . ते गुरुकुल ज्या वाड्यात होते तो वाडा हा एका सावकाराचा होता . त्या वाड्यात त्या सावकाराचे कुटुंब राहुच शकले नाही , कारण त्या वाड्यात भूतपिशाच्यांचा वावर होता . म्हणूनच त्या सावकारने त्याला विचित्र भीतीदायक अनुभव आल्यामुळे तो वाडा या वेदमूर्तिना फुकट त्यांच्या गुरूकुलांसाठी दिला होता . गुरुकुलात दैनंदिन वेदपठन होत असे …त्यात रुद्राभिषेक ही विद्यार्थ्यांना शिकविला जात असे . म्हणजे त्या वास्तुत नित्य धार्मिक वेदपठण , मंत्र स्तोत्र पठण , पूजा पाठ ,आरत्या , अभिषेक होत जरी होत्या तरी देखील कधीकधी त्या वास्तुत रात्री त्या वाड्यातील सर्व भूते एकत्र येवून खुप मस्ती दंगा करीत असत .धड़ाधड़ा माड़ीवर नाचत असत , धुडगुस घालीत , विचित्र आवाज करत असत .. उच्छयाद मांडत असत ..रात्री त्या गुरुकुलातील विद्यार्थी घाबरत असत , अशा वेळी ते वेदमुर्ती गुरु ,त्या पिशाच्यांना नुसते दरडावून सांगत असत , रागावत असत की ” *काय रे काय चाललय ?* वर येवू कां ? असे म्हटल्यावर ती पिशाच्च्ये चिडिचुप होत गप्प बसत ..या गुरुकुलात माझेच वडिल शिकले होते . त्यांच्याच तोंडुन मी स्वतः ऐकलेली ही गोष्ट आहे …पुढे या वेदपाठशाळेतील आध्यात्मिक , शुचिर्भूत , धार्मिक वातावरणामुळे त्या वाड्यातील भूतपिशाच्य गायब झाले ..आता तेथे गुरुकुल नाही पण मोठ्ठी इमारत उभी आहे …

भूतपिशाच्च्य योनीचे वास्तव्य हे चांगल्या मंगलमय , संस्कारक्षम , अशा वातावरणात असु शकत नाही . ते निर्जन ठिकाणी , तळी , विहरी , माळराने , जुनाट वाडे , जुनाट वृक्ष , नदीकाठी , स्मशाने अशाच ठिकाणी असल्याचे जाणवते असा समज आहे .

आजही कधी कधी आपण एखाद्या वास्तूत गेलो आणि तो वास्तू दूषित असेल तर तेथे आपले मन अस्वस्थ होते , तिथे आपण थांबू शकत नाही असेही अनुभव आहेत.

थोडक्यात आपले वर्तन जर चांगले असेल , शुद्ध सुसंस्कृत असेल तर आपल्याला भूतपिशाच्च योनीचा त्रास होत नाही असे दृष्टोत्पत्तीस येते ..!

 

(ऐकलेली गोष्ट)..

 

*©विगसा*

 

👍👍👍👍👍👍

 

 

*संवाद मिडिया*

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण (Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

*Advt Link👇*

————————————————–

📝 *प्रवेश सुरु!* *प्रवेश सुरु!*📝

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण ( Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

👉 Ju Kg ते आठवी वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी जेवण 🍛व क्लासची एकत्रित सुविधा 📚👩🏻‍💻

 

(होमवर्क तसेच Grammer इत्यादीचा परिपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट)📑

 

👉 TV, Mobile यापासून दूर ठेऊन मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेशीत

 

⏰ *वेळ: सकाळी 10 ते 5:30 पर्यंत*

 

👉 (मिलाग्रीस हायस्कूल मधील मुलांना पिकअप करण्याची सोय आहे)

 

*पत्ता:* बाबा फर्नांडिस F – 122, बांदेकर मेस समोर, मिलाग्रीस हायस्कूल नजिक, सालईवाडा, सावंतवाडी

 

📱 *संपर्क:*

सौ.सरोज राऊळ मो.नं: 8983757132

सौ.सुरेखा बोंद्रे मो. नं: 8975257453

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा