You are currently viewing काव्यप्रेमी शिक्षक मंचच्या दशकपूर्ती सोहळ्यात कवयित्री प्रज्ञा घोडके यांना शी.क.बा. (शीघ्र कवींचा बादशहा) पुरस्कार प्रदान

काव्यप्रेमी शिक्षक मंचच्या दशकपूर्ती सोहळ्यात कवयित्री प्रज्ञा घोडके यांना शी.क.बा. (शीघ्र कवींचा बादशहा) पुरस्कार प्रदान

सोलापूर :

काव्यप्रेमी शिक्षक मंच, सोलापूर यांचा दशकपूर्ती निमित्त राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार वितरण सोहळा सोलापूर येथील लोकमान्य टिळक सभागृह येथे पार पडला. त्यावेळी डाॅ. महानवर बोलत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद घोडके यांनी केले.

यावेळी जेष्ठ समीक्षक व साहित्यिक डाॅ. सुहास पुजारी यांनी काव्यप्रेमी शिक्षक मंच ही मराठी अस्मितेसाठी सातत्याने धडपडणारी संस्था असून संस्थेच्या दहा वर्षाच्या कार्यकाळाचा मी साक्षीदार आहे असे गौरवोद्गार काढले. तसेच पद्माकर कुलकर्णी व अध्यक डाॅ. इ.जा. तांबोळी यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले.

या प्रसंगी सन २०२५-२६ मध्ये प्रकाशित झालेल्या कथासंग्रह,काव्यसंग्रहांना पुरस्कार देण्यात आले. तसेच का.शि.मं. मधील श्री.एन.जे.पाटील प्रायोजित त्यांचे स्व. माता-पित्यांचे स्मरणार्थ वर्षभर घेण्यात आलेल्या दर रविवारीय स्पर्धेतील पाच विजेत्यांना शी.क.बा. ( शीघ्र कवींचा बादशहा हा पुरस्कार देण्यात आला. त्यामध्ये पुण्याच्या सौ. प्रज्ञा घोडके यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यात सन्मानपत्र, ट्राॅफी व पाच पुस्तके असे पुरस्काराचे स्वरूप होते. सौ. प्रज्ञा घोडके यांच्या *’देवत्व’ व ‘गेले द्यायचे राहून’* या दोन काव्यसंग्रहांचे का.शि.मं. द्वारे दिमाखदार प्रकाशन करण्यात आले तसेच सर्व मान्यवरांकडून त्यांचे भरभरून कौतुक, अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा