You are currently viewing मोटर सायकल चोरी करताना दोघांना रंगेहाथ पकडले…सावंतवाडीतील एका महिलेचाही समावेश

मोटर सायकल चोरी करताना दोघांना रंगेहाथ पकडले…सावंतवाडीतील एका महिलेचाही समावेश

*आरोस (गावठण) तालुका सावंतवाडी येथील घटना*

सावंतवाडी :

 

सावंतवाडी तालुक्यातील आरोस गावठण येथे आज पहाटे ४.०० वाजण्याच्या सुमारास दोन मोटरसायकल चोरांना चोरी करून गाडी पळवून नेताना रंगेहात पकडले. यात एका महिलेचाही समावेश आहे.

आरोस येथे घडलेली घटना अशी की, गावातील श्री.योगेश सगुण देऊलकर व त्यांचे बंधू संदेश हे दोघे पहाटे चार वाजण्याच्या सुमारास कामानिमित्त बाहेर जाण्यासाठी निघाले होते. देऊलकर बंधूंची घरे रस्त्यापासून सखल भागात असल्याने तेथील लोकांच्या दुचाकी या रस्त्याच्या कडेला सुरक्षित जागी रात्रीच्या वेळी उभ्या केल्या जातात. आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास योगेश देऊलकर कामाला जाण्यासाठी रस्त्यावर आला असता त्यांची गाडी कोणीतरी अज्ञात इसम स्टार्ट करून पळवून नेत असल्याचे त्याने पाहिले. तात्काळ आपला बंधू संदेश यांच्या सोबतीने त्यांच्या ताब्यातील चार चाकी गाडीने चोरांचा पाठलाग केला व गाडी चोरून नेताना दोघांना रंगेहात पकडले. यात हुसेन राजासहाब मुजावर व वेदिका हुसेन मुजावर दोघेही रा. सालईवाडा, सावंतवाडी अशी संशयितांची नावे आहेत. संशयित दोघेही त्यांच्या ताब्यातील एक्टिवा दुचाकीवरून आले असल्याचे समजत असून हुसेन मुजावर यांनी मोटरसायकल चोरी करून पळत होते तर एक्टिवा दुचाकी वेदिका मुजावर चालवीत असल्याचे आढळून आले.

आरोस सारख्या सावंतवाडी शहरापासून वीस बावीस किलोमीटर दूर असलेल्या गावात अशा प्रकारे केली जाणारी चोरी म्हणजे गावातील मोटरसायकली कुठे लावल्या जातात याची टेहाळणी करून सराईतपणे केलेला चोरीचा प्रयत्न दिसून येत आहे. योगेश देऊलकर व संदेश हे दोघेही बंधू सुदैवाने कामासाठी त्याच वेळी बाहेर पडल्याने संशयित पकडले गेले. देऊलकर यांच्या तक्रारीनंतर सावंतवाडी पोलिसांनी संशयीतांना ताब्यात घेऊन पुढील तपासाकामी सावंतवाडी येथे नेण्यात आल्याचे समजले.

प्रतिक्रिया व्यक्त करा