You are currently viewing कणकवलीत चांद्रयान -3 च्या लँडिंग चा ऐतिहासिक क्षण अनुभवता येणार

कणकवलीत चांद्रयान -3 च्या लँडिंग चा ऐतिहासिक क्षण अनुभवता येणार

आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून पटवर्धन चौकात लावणार एलईडी स्क्रीन

विद्यार्थी, पालक,शिक्षक,यांनी सहभागी होवून सुवर्ण क्षणाचे साक्षीदार व्हा

५.३० वाजल्या पासून होणार प्रसारण; माजी नगराध्यक्ष समीर नलावडे याची माहिती

कणकवली 

भारताचे चांद्रयान ३ आज सायंकाळी 6.4 मिनिटांनी चंद्रावर लँड होणार असून जगात भारताच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक क्षण आहे. संपूर्ण भारतामध्ये या क्षणाची आतुरतेने वाट पाहिली जात असताना कणकवलीत देखील या चंद्रयान लँडिंग चा क्षण सर्व जनतेला पाहता यावा याकरिता भाजपा नेते, आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून कणकवली पटवर्धन चौकात चंद्रयान लँडिंग चा सोहळा लाईव्ह दाखवला जाणार आहे. याकरिता कणकवली पटवर्धन चौक येथे भव्य स्क्रीन उभारली जाणार असून या स्क्रीनच्या माध्यमातून चंद्रयान लँडिंग चा ऐतिहासिक क्षण लोकांना अनुभवता येणार आहे. अशी माहिती माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. कणकवली पटवर्धन चौकामध्ये सायंकाळी 5.30 वाजल्यापासून हा सोहळा लाईव्ह दाखविण्यात येणार आहे. जेणेकरून भारतातील प्रत्येक नागरिकाला असलेली ही उत्सुकता कणकवलीकरांना देखील अनुभवता यावी याकरिता कणकवली शहरवासीयांनी पटवर्धन चौकात या ऐतिहासिक क्षणाचा अनुभव घेण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 3 =