You are currently viewing कराटे स्पर्धेत टोपीवालाची सानिका गावकर सुवर्ण पदकाची मानकरी…

कराटे स्पर्धेत टोपीवालाची सानिका गावकर सुवर्ण पदकाची मानकरी…

मालवण

येथील टोपीवाला हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाच्या इयत्ता बारावी कला शाखेची विद्यार्थिनी सानिका गावकर हिने मडगाव-गोवा येथे झालेल्या चौथ्या नॅशनल कराटे चॅम्पियन्स स्पर्धेत कराटे कता आणि कुमिते या प्रकारात सुवर्णपदक पटकाविले आहे. तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, विश्वस्त, मुख्याध्यापक डी. एस. खानोलकर, क्रीडा शिक्षक, अन्य शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × four =