You are currently viewing अमरावतीच्या विभागीय आयुक्त श्रीमती निधी पाण्डेय : एक कर्तव्यदक्ष आयुक्त

अमरावतीच्या विभागीय आयुक्त श्रीमती निधी पाण्डेय : एक कर्तव्यदक्ष आयुक्त

*अमरावतीच्या विभागीय आयुक्त श्रीमती निधी पाण्डेय : एक कर्तव्यदक्ष आयुक्त*
==============
गेल्या पन्नास वर्षात वेगवेगळ्या चळवळीत कार्यरत असल्यामुळे व गेल्या 23 वर्षापासून आयएएस मिशनमध्ये काम करीत असल्यामुळे अनेक आयएएस आयपीएस अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सातत्याने होत राहतात .काही अधिकारी असे असतात की जे कायमचे स्मरणात राहतात .असाच योगायोग अमरावतीच्या विभागीय आयुक्त श्रीमती निधी पाण्डेय मॅडम यांच्या बाबतीत म्हणावा लागेल .मी सतत दौऱ्यात असल्यामुळे विभागीय आयुक्त म्हणून श्रीमती पांडेय मॅडम रुजू झाल्यानंतर त्यांना बऱ्याच दिवसानंतर मी भेटलो. निमित्त होते अमरावतीला होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धा परीक्षा कार्यशाळेचे .ही कार्यशाळा ६ जून रोजी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकानिमित्त आम्ही आयोजित केली होती. मी विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचलो .कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी माझे व्हिजिटिंग कार्ड आतमध्ये पाठवले आणि एकच मिनिटांमध्ये श्रीमती निधी पाण्डेय मॅडमनी मला आत बोलावले. मी गुड इवीनिंग म्हणताच मॅडमनी प्रतिसाद दिला आणि मला बसायला सांगितले .मी माझा स्वतःचा परिचय करून दिला .कारण मॅडमची माझी ही पहिली भेट होती .मिशन आयएएसबद्दल अगदी थोडक्यात त्यांना माहिती सांगितली .तसेच मी स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिराचे रितसर निमंत्रण असलेले पाकीट त्यांना द्यावयाला एक शिष्टाचार म्हणून उभा राहिलो आणि आणि मला धक्का बसला.पाण्डेय मॅडम पत्र घेण्यासाठी चक्क उभ्या झाल्या. त्यांनी ते पत्र स्वीकारले. वाचले आणि मला म्हणाल्या मी नक्की येते. मी कोण्या दिवशी येणार आहे हे तुम्हाला फोन करून कळविते .अतिशय हास्यवादाने ते त्यांनी पत्र स्वीकारले आणि हास्य वदनाने मी त्यांचा लगेच निरोप घ्यायला लागलो. मी जसा खुर्चीवरून उठलो आणि त्यांना निरोपाचा नमस्कार करायला लागलो. तेव्हा मॅडम देखील खुर्चीवरून उठल्या आणि माझ्या निरोपाच्या नमस्काराचा त्यांनी हसतमुखाने स्वीकार केला. मी कक्षाच्या बाहेर आलो .आमची ही भेट उणे पुरे पाच मिनिटांची असेल .पण या पाच मिनिटांमध्ये आदर्श विभागीय आयुक्त कसा असावा याचा एक आदर्श नमुना मॅडमनी आमच्यासमोर ठेवून दिला .आम्ही लेखक. त्यामुळे प्रत्येकाची नोंद आमच्यात कायमची असते. मॅडमनी पाच मिनिटांमध्ये जी वागणूक दिली ती दीर्घकाळ टिकून राहण्यासारखी आहे .खरं म्हणजे विभागीय आयुक्त हे आपल्या विभागातील सर्वोच्च पद असलेली जागा .त्या जागेवर एक अतिशय सुस्वभावी हसतमुख आणि पॉझिटिव्ह विचारसरणी असलेली व्यक्ती जेव्हा विराजमान होते तेव्हा पूर्ण प्रशासनाला नकळत गतीमानता येते .माझे निमंत्रण स्वीकारायला उभे राहणे. हसतमुखाने स्वागत करणे .मी नक्की येथे असे म्हणणे. मी स्वतःहून फोन करते आणि मी जेव्हा निरोपाला निघालो तेव्हा आपल्या खुर्चीवरून उठून निरोप देणे या सगळ्याच गोष्टी नोंदणीय आहेत.६ जूनला शिवराज्याभिषेकानिमित्त आमचे स्पर्धा परीक्षेचे राष्ट्रीय स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिर अमरावतीला सुरू झाले. संपूर्ण महाराष्ट्रातून मुलं मुली आलेल्या .मला शिबिराचा परिसर सोडणे शक्यच नव्हते .एक आठवण म्हणून मी माझे सहकारी श्री मनोहर वासनकर यांना श्रोमती निधी पांण्डेय मॅडम यांना भेटावयास पाठविले. मॅडमनी शिबिराला येते म्हणून परत फोन करायला सांगितले .एवढेच नाही तर मॅडमनी चक्क आपला मोबाईल नंबर श्री वासनकरांना दिला आणि सांगितले की सरांना मला फोन करायला सांगा .मी येते म्हणूनही सांगा .एक विभागीय आयुक्त आपला मोबाईल नंबर देतो हे खरोखरच नोंद करण्यासारखे आहे .श्री वासनकर परत आले आणि मला त्यांनी मॅडमचा मोबाईल नंबर दिला .मी दुसऱ्या दिवशी मॅडमला फोन लावला. आमचे शिबिर मार्डी रोडवरील ग्रीन सर्कलमध्ये सुरू होते. तिथे रेंजचा प्रॉब्लेम होता. मॅडमचा फोन लागला नाही. पण एकच मिनिटांमध्ये माझा फोन परत खणखणला. मी पाहिले तो निधी पाण्डेय मॅडमचाच फोन होता. त्यांनी स्वतःहून मला फोन केला होता. त्या म्हणाल्या महामहीम राज्यपाल साहेबांचा दौरा ठरला आहे. मला तातडीने धारणीला जावयाचे आहे .धारणीवरून लोणार विकास आराखडा व शेगाव विकास आराखडा यांच्या बैठकीला उपस्थित राहायचे आहे. पण मी किती तारखेला येणार हे तुम्हाला शनिवारी कळविते. माझ्यासाठी हा दुसरा धक्का होता .एका विभागीय आयुक्तांनी स्वतःहून फोन करणे आणि आपण जे काम करीत आहात त्या कामाला त्या कामात मी उपस्थित राहून येणाऱ्या मुलांना मार्गदर्शन करणार हे त्यांनी नकळत सुचित केले.
सन्माननीय पाण्डेय मॅडमची ही वागणूक चळवळीमध्ये काम करणाऱ्या आमच्यासारख्या लोकांना खूप कामाची असते .एक अतिशय व्यस्त असणारा अधिकारी पाच विभागाची जबाबदारी असणारा अधिकारी इतक्या प्रेमळ भावनेने इतक्या कर्तव्यदक्षतेने आमची दखल घेतो हे खरोखरच शब्दातीत आहे .शिबीर संपल्याबरोबर त्याच दिवशी मी मा. श्री ज्ञानेश्वर मुळे आय एफ एस मा. परराष्ट्र सचिव यांनी कोल्हापूरला अरेंज केलेल्या एका आठवड्याच्या शिबिरासाठी रवाना झालो. मी कोल्हापूरला पोहोचलो आणि माझे आय ए एस ची तयारी करणारे श्री प्रशांत भाग्यवंत यांचा मला फोन आला. त्यांना श्रीमती निधी पाण्डेय मॅडमशी भेटायचं होतं. एक छोटेसे काम होते .मी मॅडमच्या कार्यालयात लगेच फोन लावला. तिथले कार्यालयीन स्वीय सहाय्यक यांनी मॅडम कार्यालयातच आहेत. त्यांनी तुमच्या विद्यार्थ्याला दहा मिनिटात भेटावयास बोलाविले आहे .असा निरोप दिला. मी प्रशांतला दहा मिनिटात विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचण्यास सांगितले .प्रशांत भाग्यवंत आणि अंकित राणे हे दोन्ही IASची स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी माझ्याकडेच राहतात आणि माझे घर ते विभागीय आयुक्त कार्यालय याच्यामध्ये फार तर चार मिनिटाचे अंतर आहे. पण मला असे वाटते प्रशांतला पोहोचायला वेळ झाला .प्रशांत जेव्हा कार्यालयात पोहोचला तेव्हा मॅडम कार्यालयातून निघून गेल्या होत्या. पण त्यांनी निरोप ठेवला होता .प्रशांत कार्यालयात पोहचला. तिथल्या स्वीय सहायकांनी प्रशांतचा नंबर नोंदवून घेतला. आणि प्रशांतला धक्काच बसला .काही वेळातच चक्क विभागीय आयुक्तांनी प्रशांतला फोन केला. त्याचे काम समजून घेतले आणि त्या कामाच्या संदर्भातील सर्व कागदपत्र त्यांच्या व्हाट्सअपवर पाठविण्यास सांगितले. ही तर फारच मोठी गोष्ट झाली. एक विभागीय आयुक्त काठोळे सरांच्या विद्यार्थ्याला स्वतःहून फोन करतो. त्याचे काम समजून घेतो आणि संबंधित कागदपत्रे व्हाट्सअपवर पाठवायला सांगतो. प्रशांतने जेव्हा हा सर्व वृत्तांत मला कोल्हापूरला कळविला तेव्हा मला देखील खूप खूप बरे वाटले . प्रशांतने सांगितलेली घटना सुखद आनंद देऊन गेली .आणि मनाला वारंवार वाटत गेले की निधी पाण्डेय मॅडमनी मला वासनकर सरांना आणि माझे विद्यार्थी श्री प्रशांत भाग्यवंतांना जी वागणूक दिली ती निश्चितच नोंदणीय आहे. अनुकरणीय आहे. प्रशासनामध्ये असे अधिकारी असले म्हणजे अधिकाऱ्यांना देखील काम करण्यास उत्साह येतो .तसेच आमच्यासारखे सामाजिक जीवनामध्ये वावरणारे जे कार्यकर्ते असतात त्या कार्यकर्त्यांना देखील कळत नकळत बळ मिळत जाते .निधी पाण्डेय मॅडमला मी एकच वेळा भेटलो .परंतु जसे नेपोलियनच्या बाबतीत म्हणतात ते भेटले त्यांनी पाहिले आणि त्यांनी जिंकले. या ओळी मँडमला तंतोतंत लागू होतात. विभागीय आयुक्त म्हणून श्रीमती निधि पाण्डेय यांनी अमरावतीला रुजू होऊन जो सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारला आहे. त्या दृष्टिकोनाला त्यांच्या समाजाभिमुख वागण्याला हृदयापासून मानाचा मुजरा.
==============
*प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे* संचालक मिशन आयएएस अमरावती 9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − 19 =