You are currently viewing सावंतवाडी पालिकेकडून व्यापारी,रिक्षाचालक व विनाकारण फिरणाऱ्यांची “आरटीपीसीआर टेस्ट”…

सावंतवाडी पालिकेकडून व्यापारी,रिक्षाचालक व विनाकारण फिरणाऱ्यांची “आरटीपीसीआर टेस्ट”…

निगेटिव्ह असलेल्यांनाच उद्या पासून सेवा देता येणार; प्रशासनाला सहकार्य करण्याचे पुंडलिक दळवींचे आवाहन…

सावंतवाडी

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संसर्ग साखळी तोडण्यासाठी शहरातील व्यापारी,भाजी विक्रेते,रिक्षा चालक व विनाकारण फिरणाऱ्यांची “आरटीपीसीआर टेस्ट” मोहीम पालिका प्रशासनाने हाती घेतली आहे.दरम्यान आज सायंकाळपासून ही तपासणी सुरू करण्यात आली आहे.तर रॅपिड टेस्ट केल्यानंतर निगेटिव्ह रिपोर्ट असलेल्यांनाच उद्या आपली आस्थापने सुरू ठेवता येणार आहेत.त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे,असे आवाहन राष्ट्रवादीचे उद्योग व व्यापार सेलचे जिल्हाध्यक्ष तथा सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केले आहे.त्यांनी सुद्धा आज स्वतः आपली तपासणी केली.यावेळी त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
यावेळी यावेळी डॉ.उमेश मसुरकर,परवीन शेख,दीपक म्हापसेकर,सुकन्या कुलकर्णी, स्नेहा आडेलकर,जीवन राणे,गणेश खोरागडे,संजीवनी शिरसाट, धनश्री मराठे आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ.मसुरकर म्हणाले, आज केवळ किटच्या मर्यादेनुसार २५ जणांची तापसी करण्यात येणार आहे.तर आता पर्यंत १० हुन अधीक जणांची तपासणी झाली असून सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.उद्या पासून रोज सकाळी १० ते २ या वेळेत ही तपासणी सुरू राहणार आहे.त्यामुळे जास्तीत-जास्त व्यापाऱ्यांनी तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांनी आपली तपासणी करून घ्यावी,असे आवाहन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + seven =