You are currently viewing वेंगुर्लेत भाजपा तालुका कार्यालयात विश्वकर्मा योजना शिबीराचे आयोजन

वेंगुर्लेत भाजपा तालुका कार्यालयात विश्वकर्मा योजना शिबीराचे आयोजन

*वेंगुर्लेत भाजपा तालुका कार्यालयात विश्वकर्मा योजना शिबीराचे आयोजन*

वेंगुर्ले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारा बलुतेदार यांच्यासाठी विश्वकर्मा योजना आणली आहे. बेकारांना रोजगार देण्याचे ध्येय असून जिल्ह्यातील सीएससी सेंटरद्वारे याचा लाभ घेऊन जास्तीत जास्त फायदा करून घ्या व तुम्ही आपला सर्वांगीण विकास करा, असे प्रतिपादन बँक ऑफ बडोदा चे अधिकारी दिलीप सुतार यांनी वेंगुर्ले येथे केले.
वेंगुर्ले भाजपाच्या वतीने आज तालुका कार्यालयात विश्वकर्मा योजना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना दिलीप सुतार बोलत होते. यावेळी भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई , विश्वकर्मा समाजाचे जिल्हाध्यक्ष शरद मेस्त्री , सीएससी सेंटरचे डिस्ट्रिक्ट मॅनेजर हर्षद ढेकणे , ओरोस सीएससी सेंटरचे सिद्धेश ढेकणे , बँक ऑफ बडोदा चे दिलीप सुतार , सौ . सुतार , भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य वसंत तांडेल , जिल्हा निमंत्रित सदस्य साईप्रसाद नाईक , जयंत मोंडकर , माजी नगरसेविका श्रेया मयेकर , मच्छिमार नेते दादा केळुसकर , बुथप्रमुख रविंद्र शिरसाट , दादा तांडेल आदींसह भाजपा पदाधिकारी तसेच तालुक्यातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते . यावेळी पीएम विश्वकर्मा योजना विनातारण लोन उपलब्ध असून याबाबत मागणी करावी ,असे आवाहन श्री. ढेकणे यांनी केले. पीएम विश्वकर्मा योजना बारा बलुतेदार यांचे रजिस्ट्रेशन करण्याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. पीएम विश्वकर्मा या योजनेचा लाभ सुतार , लोहार ,सोनार ,कुंभार न्हावी ,फुलारी ,धोबी ,शिंपी , मेस्त्री ,चर्मकार ,अस्त्रकार ,बोटबांधारी ,अवजारे बनवणारे ,खेळणी बनवणारे , चावी बनविणारे , मासेमारी जाळे विणणारे अशा अठरा प्रकारच्या पारंपारिक कारागीरांना व्यवसायासाठी आर्थिक मदत व प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारने ही योजना सुरू केली आहे. ही योजना सुरू केल्यानंतर या योजनेची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम जिल्हा तसेच तालुका भाजपामार्फत सक्रियरित्या सुरू असून जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा व्हावा ,यासाठी प्रयत्न सुरू आहेत ,असे यावेळी बोलताना प्रसन्ना देसाई यांनी सांगितले .जिल्ह्यातील सुमारे 945 जणांनी रजिस्ट्रेशन केले आहे. आज वेंगुर्ले येथे झालेल्या या योजनेमध्ये एकूण 85 जणांनी नोंदणी केली.

*संवाद मीडिया*

🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕

*mai hyundai*

*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*

*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/

*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर *

*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*

*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*

*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.

*फो. +91 7410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121687/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen + eight =