You are currently viewing न्हावेली मंदिरातील फंड पेटी अज्ञात चोरट्याने फोडली…

न्हावेली मंदिरातील फंड पेटी अज्ञात चोरट्याने फोडली…

तत्काळ श्वान पथक पाचारण करण्याची मागणी; अज्ञात चोरटे स्थानिक असण्याचा संशय

 

सावंतवाडी :

 

न्हावेली (ता. सावंतवाडी) येथील श्री देवी माऊली मंदिरातील फंड पेटी अज्ञात चोरट्याने फोडली. मध्यरात्रीच्या दरम्यान ही चोरीची घटना घडल्याचा संशय आहे. घटनास्थळी टिकाव आढळून आल्याने अज्ञात चोरटा स्थानिकच असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान शेजारी सोनूर्ली गावातील मंदिरातही काही महिन्यापूर्वी चोरीची घटना घडली होती. अज्ञात चोरट्याने किमती ऐवज लंपास केला होता. या चोरीच्या तपास कामात अद्यापही पोलिसांना यश आले नाही. न्हावेली येथील मंदिरातील फंड पेटी चोरीच्या घटनेमुळे पोलिसांसमोर पुन्हा एकदा आवाहन निर्माण झाले आहे. चोरीच्या घटनेची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान उपसमितीच्या पदाधिकाऱ्यांनी सातार्डा पोलीस दुरक्षेत्रात दिली आहे. श्वान पथक पाचारण करून अज्ञात चोरट्यांचा तत्काळ शोध घ्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा