You are currently viewing संरक्षण भिंतीच्या कचलेल्या ठिकाणी तात्काळ भराव टाका अन्यथा वृक्षारोपण करु 

संरक्षण भिंतीच्या कचलेल्या ठिकाणी तात्काळ भराव टाका अन्यथा वृक्षारोपण करु 

राष्ट्रवादीच्या पुंडलिक दळवी चा बांधकाम विभागाला इशारा

सावंतवाडी

लाखो रुपये खर्च बांधकाम विभागाने बांधलेली मोती तलावाची संरक्षण भिंतीच्या ठिकाणी टाकलेला भराव खसल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली त्यामुळे बांधकाम विभागात येत्या दोन दिवसात त्या ठिकाणी माती टाकून संभाव्य धोका टाळावा अन्यथा राष्ट्रवादीच्या माध्यमातून तेथे वृक्षारोपण करू असा इशारा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी दिला आहे.
तर ठेकेदाराच्या चुकीमुळे पुन्हा तो कठडा पुन्हा कोसळण्याची शक्यता आहे त्यासाठी तात्काळ बांधकाम विभागाने खबरदारी घ्यावी अशी ही मागणी श्री दळवी यांनी केली आहे

येथील उपजिल्हा रुग्णालयासमोर कोसळलेल्या संरक्षण करण्याच्या जागी लाखो रुपये खर्च करून सार्वजनिक बांधकाम विभागाने पुन्हा संरक्षण कचरा उभारला परंतु ज्या पद्धतीने मातीचा भराव त्या ठिकाणी टाकला पाहिजे होता कसा भरावा संबंधित ठेकेदाराने न टाकल्याने दोन दिवसाच्या पावसाच्या पाण्यानेच सदरचा भराव खचला आहे. त्यामुळे सदरची भिंत पुन्हा एकदा कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही आज या ठिकाणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी करत ठेकेदाराच्या व बांधकाम विभागाच्या ढिसाळ कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. संबंधित बांधकाम विभागाने तात्काळ या ठिकाणी भराव टाकून पुढील संभाव्य धोका टाळावा असे मागणी तालुकाध्यक्ष श्री दळवी यांनी केली आहे. तसेच खचलेला ठिकाणी बॅरिगेटिंग करण्यात यावे जेणेकरून तिथे कुठच्याही प्रकारचा अपघात होऊन मनुष्यहानी अथवा वित्त आणि होऊ नये याचीही काळजी घ्यावी अन्यथा सदर ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार असा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने इशारा देण्यात आला. यावेळी तालुका उपाध्यक्ष बावतीस फर्नांडिस,स्पर्धा अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष इफ्तिकार राजगुरू,राकेश नेवगी, फिरोज खान आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen + sixteen =