You are currently viewing सावंतवाडीतील ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचा ६ जानेवारीला  लाक्षणिक उपोषणाचा इशारा 

सावंतवाडीतील ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचा ६ जानेवारीला  लाक्षणिक उपोषणाचा इशारा 

सावंतवाडी

कोरोना काळात सेवा बजावणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासनाने जाहीर केलेल्या प्रोत्साहन भत्त्याच्या उर्वरित रक्कम अद्याप मिळाली नाही. त्यामुळे ती रक्कम तात्काळ मिळावी, या मागणीसाठी संघटनेच्यावतीने ६ जानेवारीला लाक्षणिक उपोषण छेडण्याचा इशारा तालुकाध्यक्ष हनुमान केदार यांनी दिला आहे. दरम्यान याबाबतचे निवेदन सावंतवाडी गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले.
कोरोना काळात काम करणार्‍या ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना नियमित वेतनाबरोबर १००० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे शासन आदेश आहेत. मात्र, केवळ एकदाच १००० रुपये देण्यात आले. या शासन आदेशाचा काही ग्रामसेवक /ग्रामविकास अधिकारी यांनी चुकीचा अर्थ लावून ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे नुकसान केले आहे, असा संघटनेने आरोप केला आहे. तर शासन आदेशाप्रमाणे सुमारे १८००० रुपये फरक रक्कम मिळण्यासाठी सावंतवाङी तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटना ६ जानेवारी २०२२ रोजी लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे, श्री.केदार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 − 2 =