You are currently viewing सिंधुदुर्गातील श्री शिवराजेश्वर मंदिरात पारंपरिक पद्धतीने कृष्ण जन्माष्टमी आणि दही हंडी उत्सव साजरा

सिंधुदुर्गातील श्री शिवराजेश्वर मंदिरात पारंपरिक पद्धतीने कृष्ण जन्माष्टमी आणि दही हंडी उत्सव साजरा

सिंधुदुर्गातील मालवणच्या समुद्रातील ऐतिहासिक किल्ले श्री शिवराजेश्वर मंदिरात पारंपरिक पद्धतीने कृष्ण जन्माष्टमी आणि दही हंडी उत्सव साजरा करण्यात आला. काल रात्री ९.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा पालखी सोहळा पार पडला. त्यानंतर १०.३० वाजता ह.भ.प. अक्षय परुळेकर बुवा यांचे शिवराजेश्वर मंदिरात कृष्ण जन्मावर आधारित कीर्तन झाले. रात्री १२.०० वाजता कृष्ण जन्म साजरा करण्यात आला. यावेळी शिवराजेश्वर मंदिराचे पुजारी सयाजी सकपाळ यांनी श्रीकृष्णाची पूजा केली.

देवस्थानचे मानकरी आणि मुंबईस्थित किल्ला रहिवासी कृष्ण जन्म सोहळ्यास उपस्थित होते. दरवर्षी प्रमाणे आज शिवराजेश्वर मंदिराची मानाची हंडी मंदिरासमोर बांधण्यात आली. तसेच शिवकाळापासून मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर (देऊळवाडा) यांच्याकडून श्री शिवराजेश्वर मंदिर येथे १ मानाची दहीहंडी पाठवली जाते. मंदिराचे पुजारी सयाजी सकपाळ यांनी पारंपरिक पद्धतीने मानाच्या दही हंड्या फोडून श्रीकृष्ण विसर्जन मिरवणुकीची सुरवात केली. कृष्ण विसर्जनासाठी शिवाजी महाराजांची पालखी सुद्धा किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत आली. विसर्जन मिरवणुकीत किल्ला रहिवाशांनी उत्साहाने सहभागी होऊन भक्तिपूर्ण वातावरणात श्रीकृष्णाचे विसर्जन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 4 =