जिल्ह्यात परीक्षेविना 70 हजार जण होणार पास

जिल्ह्यात परीक्षेविना 70 हजार जण होणार पास

ओरोस (सिंधुदुर्ग) 

गतवर्षीप्रमाणे पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना यावर्षीही कोरोना पावला आहे. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पास करण्याच्या राज्याच्या घोषणेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 69 हजार 715 विद्यार्थी परीक्षा न देता पास होणार आहेत. परीक्षा न घेणे हा निर्णय मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगला असला तरी मुलांच्या बौद्धीक क्षमतेवर परिणाम करणार असल्याच्या प्रतिक्रिया पालक व शिक्षण तज्ज्ञांमधून उमटत आहेत.

देशात गतवर्षी दाखल झालेल्या कोरोनामुळे पहिली ते आठवीच्या मुलांना पास करण्यात आले होते. त्यांच्या अंतिम परीक्षा घेण्यात आल्या नव्हत्या. आताही राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा