You are currently viewing शेतकऱ्यांनी केवळ एक रुपया भरुन पीक विमा योजनेत सहभागी व्हा

शेतकऱ्यांनी केवळ एक रुपया भरुन पीक विमा योजनेत सहभागी व्हा

शेतकऱ्यांनी केवळ एक रुपया भरुन पीक विमा योजनेत सहभागी व्हा

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामामध्ये केवळ एक रुपयात भात, नाचणी या पिकांकरिता पीक विमा योजनेत 31 जुलै पर्यंत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांनी केले आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा याकरीता येणाऱ्या प्रधानमंत्री पीक योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. योजनेत सहभागी शेतकऱ्यांना पेरणी न होणे तसेच पूर दुष्काळ, पावसातील खंड यामुळे होणारे नुकसान, गारपीट, भूस्खलन, क्षेत्र जलमय होणे, वीज कोसळणे, ढगफुटी अशा स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान व काढणीनंतर शेतात सुकवणीसाठी ठेवलेल्या पिकांचे होणारे नुकसान या सर्व बाबींकरिता विमा संरक्षण लाभणार आहे. खरीप हंगामामध्ये कोकण विभागामधील शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात भात, नाचणी या पिकांकरिता पीक विमा उतरविता येईल. शेतकरी हिस्स्याची विमा हप्ता रु.1 वजा जाता राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. या योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होण्याचे घोषणापत्र योजनेत सहभागी होण्याच्या मुदतीच्या सात दिवस आधी बँकेत सादर करावे. घोषणापत्र दिलेल्या शेतकऱ्यांना योजनेच्या सहभागातून वगळ्यात येईल.

जिल्ह्यातील भात पिकाकरिता अधिसूचित असलेल्या 57 महसूल मंडळांमध्ये, नाचणी पिकाकरिता अधिसूचित 52 महसूल मडळांमध्ये ही योजना लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये नियुक्त युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमार्फत पीक विमा योजना राबविण्यात येणार आहे.

पीक, भात विमा संरक्षित रक्कम रु. हेक्टर 51,760 जोखिम स्तर. 70 टक्के, नागली, विमा संरक्षित रक्कम रु. हेक्टर 20,000 जोखिम स्तर 70 टक्के.

ई- पीक पाहणीव्दारे नोंदविलेले पीक अंतिम गृहित धरण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांनी ई पीक पहाणी अंतर्गत पिकांची नोंदणी करावी. योजनेची अंमलबजावणी करताना रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजी, ड्रोन, स्मार्टफोन, डिजिटल माहिती स्त्रोत अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा करण्यात येईल. विविध जोखार्मिगतर्गत निश्चित होणारी नुकसान भरपाई हि केंद्र शासनाच्या मार्गर्शक सुचनातील अटी व शतींचा अधीन राहून निश्चित केली जाईल.

खरीप हंगाम 2023 करिता सहभागाची अंतिम मुदत दि.30 जुलै 2023 अशी आहे. पीक विम्यासाठी अर्ज सादर करताना बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी 7/12 उतारा,  आधार कार्ड, पेरणी घोषणापत्र,बॅकखात्याचे तपशील प्रत सोबत जोडणे आवश्यक आहे. पीक विमा पोर्टल, विमा कंपनी संकेस्थळ, बँक, पीक विमा ऍप इत्यादी माध्यमांव्दारे शेतकरी योजनेत सहभागी होऊ शकतात. पीक विमा योजनेचे अर्ज भरताना बँकामधील गर्दी टाळावी याकरिता केंद्रामार्फत (सी.एस.सी)ऑनलाईन पध्दतीने पीक विमा अर्ज दाखल करण्यात येईल.

शेतकऱ्यांना पीक विमा अर्ज भरताना कुठलीही अडचण येणार नाही याची काळजी कृषी विभागाकडून घेण्यात येत आहे. पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेवटचे 7 दिवस बाकी असल्यामुळे शेतकऱ्यांनी पीक विमा संरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा