You are currently viewing कुडाळ येथील विजय मेस्री यांना पुण्यातील आर्ट बिटस् महाराष्ट्र “कला सन्मान” हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

कुडाळ येथील विजय मेस्री यांना पुण्यातील आर्ट बिटस् महाराष्ट्र “कला सन्मान” हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

कुडाळ :

 

कुडाळ तालुक्यातील पिंगुळीचे विजय तुकाराम मेस्री यांना पुण्यातील आर्ट बिटस् महाराष्ट्र “कला सन्मान” हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

“*रांगोळी चित्र*” या कला विभागात हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला असून, आर्ट बिटस् फौंडेशन पुणे कडून प्रौढ कलाकारांना सन्मानित करण्यासाठी हा पुरस्कार ऑनलाईन पध्दतीने प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारामुळे विजय तुकाराम मेस्री यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

या पुरस्काराची माहिती देतांना आर्ट बिटस् पुणे या संस्थेचे संस्थापक, संचालक संतोष पांचाळ म्हणाले की एकूण सहा कला विभागात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात, त्यासाठी १ मे ते ३१ जुलै दरम्यान महाराष्ट्रातून अनेक कलाकार दरवर्षी आपली माहिती पाठवतात. त्यातून विशेष कामाची दखल घेऊन ही निवड करण्यात येते.

आर्ट बिटस् ही संस्था गेली एकवीस वर्षे सातत्याने चित्र, शिल्प, संगीत, अभिनय, नृत्य आणि लोककला आशा सर्वच विभागातील कला कलाक्षेत्रातील कलाकारांना सक्षम व्यासपीठ व प्रोत्साहन देण्यासाठी काम करीत आहे.

या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तळागाळातील कलाकारांसाठी महाराष्ट्रातील सर्वात मोठा डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म उपलब्ध दिला आहे. त्यामुळे आपली कला लाखो लोकांपर्यंत पोहचली जाते. यासाठी सर्व स्तरातील कलाकारांनी या संस्थेकडे संपर्क साधावा असे आवाहन आर्ट बिटस् फौंडेशन या संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा