You are currently viewing बीज अंकुरे अंकुरे…

बीज अंकुरे अंकुरे…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य लेखिका कवयित्री मोनिका बासरकर लिखित अप्रतिम लेख*

 

*बीज अंकुरे अंकुरे….*

 

एखादे बीज जेव्हा आपण पेरतो तेव्हां लगेच दुसरे दिवशी त्या बीजाचे झाड होत नाही. त्या बीजाला रुजायला,त्याला मोड यायला,त्याला फुलायला, फळा यला एक विशिष्ट असा कालावधी लागतो. ते इवले रोप जेव्हा वाढत असते तेव्हा त्याला संगोपनाची गरज असते. त्याला पोषक अशी माती,खत ह्याची आवश्यकता असते. ह्या बाबी तर आवश्यक आहेतच ह्या शिवाय त्याला वाढण्यासाठी सगळ्यात महत्वाचा असतो सूर्य प्रकाश, पाणी. रोपाला वाढायला ऊन – पाणी दोन्ही लागते कधी कधी त्याला जोराचा वारा,पाऊस,वादळ ह्या गोष्टींचा सुद्धा सामना करावा लागतो आणि तेव्हाच ते सक्षम बनते. चांगल्या गोष्टी घडायला वेळ लागतो ,चांगल्या गोष्टींना आकार घ्यायला ऊन आणि पाऊस अशा दोन्ही गोष्टी गरजेच्या असतात त्या शिवाय त्यांना महत्व कसे येईल.

जीवन जगत असताना सुद्धा हा नियम नक्की च लागू होतो. माणसाचं जीवन सुद्धा रोज जडण घडणीचा भाग आहे. हल्ली च्या काळात मनुष्याला सगळ्या गोष्टींची घाई झालेली असते ,आज काही तरी केलं की लगेच दुसरे दिवशी त्याचा परिणाम दिसावा अशी अपेक्षा असते. पण खरे तर ही अपेक्षाच चुकीची आहे.

माणसाचं जन्म होताना सुद्धा ९ महिन्याचा कालावधी लागतो. प्रत्येक महिन्यात एक एक अवयव तयार होतात आणि मग एक मनुष्य निर्माण होतो. तसेच असते समजा आपण एखादी चांगली गोष्टी करायचे हाती घेतले तर त्याला पूरक असा वेळ द्यावाच लागतो मगच त्याचे परिणाम व्यवस्थित दिसून येतात. आपण जेव्हा एखादा बदल करायचा ठरवतो मग तो कुठला पण असो अगदी स्वतः मध्ये पण बदल घडवायचा असेल तर वेळ द्या. एक एक गोष्टी ला आकार घेण्यासाठी त्याला जो वेळ लागतो तो घेऊ द्यायला हवा.

आणि हा दृष्टिकोन फक्तं स्वतः साठीच नव्हे तर इतरांच्या बाबतीत पण लागू करा . आपण नकळत पणे अपेक्षा करतो की समोरची व्यक्ती लगेच बदलायला हवी पण तसे नसते. त्या व्यक्ती ला सुद्धा स्वतः मध्ये बदल घडवायला वेळ लागतच असतो.

चांगल्या गोष्टींना वेळ लागतच असतो. बरं नुसता वेळच देऊन उपयोग नसतो तर काही सुखद – दुःखद अनुभव पण आवश्यक असतात. थोडे ऊन पाऊस,वादळ पण झेलायला हवे मगचं ती गोष्ट टिकून राहते.

मूर्ती बनण्या पूर्वी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात , सोण्याला सुद्धा चकाकी येण्याआधी आगी चे चटके सोसावेच लागतात मग च त्या दगडाला देव पण आणि सोन्याला योग्य ती किंमत मिळते.

आयुष्य घडत असताना,अथवा आयुष्यात चांगले बदलाव करत असताना अशा अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते.

दिलेला योग्य वेळ , आलेले अनुभव, सोसलेले घाव,लागलेले चटके बसल्या शिवाय मनुष्याच्या जीवनाला ही अर्थ उरत नाही.

म्हणूनच वेळ द्या,वेळ घ्या,अनुभवांनी समृध्द होऊन वाढत रहा,फुलत रहा आणि बहरत रहा.

 

© मोनिका बासरकर

 

*संवाद मिडिया*

 

😊 *”मनासारख लोकेशन”….विश्वास अन् “स्वतःच्या घराचे समाधान” देणारा वास्तुप्रकल्प – ||ज्ञानेश्वरी||*🏬

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

*बुकिंग सुर… बुकिंग सुरू…*📝

 

*मुंबई आणि चिपळूण मध्ये मिळालेल्या यशस्वी प्रतिसादानंतर 😇आता खास आपल्या गावी आपल्या माणसांच्या सेवेसाठी* 🏨

 

*मनासारख लोकेशन*….विश्वास अन् *स्वतःच्या घराचे समाधान* देणारा वास्तुप्रकल्प..

 

🏬 *D. D. S. Buildcon घेऊन आले..*🏬

 

🏨 _*||ज्ञानेश्वरी||*_🏨

 

*सुविधा :*

 

▪️बिल्डिंग नं. १ : दुकान गाळे + पार्किंग + ६ मजले

 

▪️बिल्डिंग नं. २ : पार्किंग + ७ मजले

 

▪️१ बीएचके, २ बीएचके, १ आरके फ्लॅटची सुविधा

 

▪️भूकंपरोधक बांधकाम

 

▪️पार्किंगमध्ये सौर ऊर्जांवर लाईट

 

▪️आकर्षक लॉबी

 

▪️लिफ्टची सोय

 

▪️ स्टील्ट पार्किंगमध्ये दोन रंगांमध्ये लादी

 

▪️पाण्याची 24 तास सोय

 

♦️ *उपक्रमाची वैशिष्ट्ये :*

 

▪️प्रत्येक इमारती समोर सीसीटीव्ही कॅमेरा

 

▪️अंतर्गत भुयारी गटारे

 

▪️वाहनतळ (स्टील्ट पार्किंग) सांडपाणी प्रक्रिया संयंत्र

 

👉 *१ आरके, १ बीएचके, २ बीएचके दुकानगाळे, ऑफिस उपलब्ध*🏬

 

🧾 *रेरा रजि नं. :* P52900048563

 

📧 *ई-मेल :* ddsbuildconpartner@gmail.com

 

🌐 *वेबसाईट :* www.ddsbuildcon.in

 

*प्रोप्रा. ज्ञानदेव सावंत*

 

📱 *संपर्क :* 9405671177 | 9405631177 | 8879181827

 

*पत्ता:* कुडाळ मार्केट व एसटी स्टँडच्या समोर चालत २ मिनिटाच्या अंतरावर तसेच रेल्वे स्थानकापासून १ किमी., ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा