You are currently viewing तिलारी धरण भरले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

तिलारी धरण भरले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

तिलारी धरण भरले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

दोडामार्ग

तालुक्यातील प्रमुख असलेल्या तिलारी प्रकल्पाच्या मुख्य धरणात पाणी साठा १०५ मी.झालाअसून पुच्छ कालव्याच्या सांडव्यातून पाणी तिलारी नदीच्या मुख्ख प्रवाहात वाहण्याची शक्यता जलसंपदा विभागाने वर्तवली आहे तर तालुक्यांत ठिकठिकाणी मुसळधार पावसामुळे नदी नाले भरून वाहत आहे तिलारी नदीच्या पात्रात तेरवण मेढे उन्नयी बंधाऱ्यातून १००घ मी/सेकंद विसर्ग सुरु असून हे पाणी पाच दरवाजे उघडल्याने पाण्याची पातळी वाढली आहे त्यामुळे उदया पाणी वाढणार असल्याने सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे पूर परिस्थिती असूनही यावर्षी छोट्या छोट्या मोऱ्यावर पुल बांधण्यात आल्याने वाहतूक बंद होण्याचा प्रकार घडला नाही त्यामुळे जनतेत समाधान व्यक्त करण्यात येत आहे

काल रात्री उशिरापर्यंत मुसळधार पावसामुळे सर्व नद्या नाले दुथडी भरून वाहत होते माञ तिलारी धरण पूर्ण क्षमतेने भरत असून अद्याप विसर्ग सूरु झाला नाहीं तरी उदया दुपारी पाणी कालव्यातून वाहण्याची शक्यता जलसंपदा विभागाने वर्तवली आहे त्यामूळे तिलारी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे परिसरातील नाले नद्या दुथडी भरून वाहत आहेत माञ सर्वत्र मुसळधार पावसामुळे लाईट येजा करत होती काही झाडे तुटुन पडल्याने काही वाहतूक व्यवस्था तात्काळ दखल घेत सुरळीत करण्यात आली तर भेडशि खालचा पुलावर कठडे बांधले नसल्याने पाणी त्याच्या जवळून वाहत होते तिलारी धरणातील पाणी नदीला सोडल्यास पूर परिस्थिती निर्माण झाली असती अशी भावना ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे यावर्षी तिलारी धरण पूर्ण क्षमतेने खाली झाले होते त्यामुळे ते भरायला उशीर झाला आहे त्यामुळे तालुक्यांतील अनेक नदी काठच्या गावांना दिलासा मिळाला आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − fourteen =