You are currently viewing शालेय विद्यार्थी अपहरण बाबत पोलीस पेट्रोलिंग वाढवा, अनुचित प्रकार रोखण्यासाठी परप्रातियांच्या नोंदी ठेवा….

शालेय विद्यार्थी अपहरण बाबत पोलीस पेट्रोलिंग वाढवा, अनुचित प्रकार रोखण्यासाठी परप्रातियांच्या नोंदी ठेवा….

मनसेची बांदा पोलिसांकडे मागणी

बांदा

येथे काही दिवसापूर्वी शालेय विद्यार्थ्यांचे अपहरण करण्याचा प्रकार झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पोलिसांनी सतर्क राहावे, परप्रांतीच्या नोंदी ठेवाव्यात ,अशी मागणी मनसेच्या माध्यमातून बांदा पोलीसांकडे करण्यात आली आहे.याबाबत बांदा शहराध्यक्ष बाळा बहिरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांना निवेदन देण्यात आले.
यावेळी विभागीय अध्यक्ष नाना सावंत, बांदा शहराध्यक्ष बाळा बहिरे, सावंतवाडी शहर अध्यक्ष आशिष सुभेदार,मंदार नाईक, विष्णु वसकर, प्रवीण गवस, ऋषिकेश शिरोडकर, आदी उपस्थित होते.शाळेच्या आवारात होणारे प्रकार लक्षात घेता पोलिसांनी कठोर भूमिका घ्यावी. आवश्यक ठिकाणी गस्त घालावी. परप्रांतीच्या नोंदी ठेवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा