You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन डि.वाय.एसपींच्या बदल्या

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन डि.वाय.एसपींच्या बदल्या

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकारी यांचे बदली आदेश राज्याच्या गृह विभागाकडून काढण्यात आले आहेत. यामध्ये राज्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे बदली आदेश राज्याच्या गृह विभागाकडून पारीत करण्यात आले आहेत

यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी रोहीणी तात्याराव सोळंके यांची बदली जयसिंगपूर उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून झाली आहे. तर कणकवली उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांची बदली सहा. पोलीस आयुक्त बृहन्मुंबई येथे करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या रिक्त होणाऱ्या दोन्ही उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर कोणाचीही नियुक्ती केलेली नाही. दरम्यान या दोन्ही पोलीस अधिकारी यांची कारकीर्द चांगली होती. अशी लोकभावना आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 1 =