You are currently viewing बांद्यात तेरेखोल नदीने धोक्याची पातळी ओलांडली

बांद्यात तेरेखोल नदीने धोक्याची पातळी ओलांडली

बांदा

बांदा परिसरात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. परिसरातील बहुतांश नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. तेरेखोल नदीला पूर आला असून धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे आळवाडा परिसरातील व्यापारी व नागरिक सतर्क झाले आहेत. दुकानातील सामान सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. बांदा वाफोली मार्गावर निमजगा येथे गटाराचे पाणी तुंबून रस्त्यावर आल्याने याठिकाणी लोकांना तसेच वाहनचालकांना पाण्यातून वाट काढावी लागत होती.

अद्यापपर्यंत पुराचे पाणी नदीच्या बाहेर आलेले नसल्याचे स्थानिकांनी सांगितले. तरीही पावसाचा रुद्रावतार पाहता धोका कायम आहे. शेर्ले येथील जुना कापई पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे कापई भागातील ग्रामस्थही सतर्क झाले आहेत. बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे व सहकारी पोलीस कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. रात्री मुसळधार पावसाचा जोर कायम राहिल्यास याठिकाणी पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 + eight =