You are currently viewing आम्ही ओंजळकर.

आम्ही ओंजळकर.

*◼️’आम्ही ओंजळकर…’*
*”ओंजळीतील शब्दफुले” समूहाचे डोंबिवलीत रंगले साहित्य स्नेहसंमेलन*

(मुंबई वार्ता)

रविवार दि.२९ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळात ‘ओंजळीतील शब्दफुले समूह’ आयोजित ‘आम्ही ओंजळकर…’ हे साहित्य स्नेहसंमेलन डोंबिवली (विनायक हॉल, गणपती मंदिर) येथे दिमाखदार संपन्न झाले. संमेलनाचे उद्घाटक डॉ.विजय जोशी (ऑस्ट्रेलिया), संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक मा‌.श्री.विजय फडणीस,
प्रमुख पाहुणे ज्येष्ठ गझलकार मा.श्री.प्रशांत वैद्य या मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद या संमेलनाला लाभले. या सर्वांचे विचार, मार्गदर्शन, रचना यांचा उपस्थित ओंजळकरांनी मनभरून आनंद घेतला. काव्यरत्नांची ओळख, साहित्यिक प्रश्नमंजुषा, उपस्थितांचे काव्यसंमेलन, आणि मांन्यवरांचे विचार असा भरगच्च कार्यक्रम दिवसभरात संपन्न झाला.


‘आम्ही ओंजळकर…’ स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी समूह प्रशासक विचैमा (विजय जोशी, चैत्राली जोगळेकर आणि मानसी चापेकर) यांनी विशेष मेहनत घेतली… अशी माहिती समूह प्रशासक श्री.विजय जोशी(विजो), डोंबिवली यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा