You are currently viewing आम्ही अजितदादां सोबत – प्रफुल्ल सुद्रिक

आम्ही अजितदादां सोबत – प्रफुल्ल सुद्रिक

कुडाळ

आमचे नेते अजितदादा पवार यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाला आमचा पाठिंबा असून आम्ही अजितदादांसोबत आहोत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल सुद्रिक यांनी दिली. प्रफुल सुद्रिक यांची अजितदादा यांचे कट्टर समर्थक म्हणून राज्यभर ओळख आहे.

आज अजितदादांनी सत्तेत सहभागी घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर निर्णयाचे स्वागत आम्ही युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केले असल्याची माहिती प्रफुल सुद्रिक यांनी दिली. त्यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसमधील जिल्हाभरातील सर्व आजी माजी कार्यकर्ते नेते पदाधिकारी हे अजितदादांबरोबरच राहणार आहेत.

अजितदादांच्या नेतृत्वाखाली युवक राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यामुळे अनेक कार्यकर्ते पुन्हा राष्ट्रवादीत सक्रिय होतील असे ते म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − 3 =