You are currently viewing विजयराव नाईक फार्मसी कॉलेजच्या इमारतीत होणार कोविड केअर सेंटर

विजयराव नाईक फार्मसी कॉलेजच्या इमारतीत होणार कोविड केअर सेंटर

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांनी केली पाहणी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या कोविड रुग्णांच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक बेडची आवश्यकता असल्याने कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी जिल्हा प्रशासनाशी चर्चा करून ताबडतोब विजयराव नाईक फार्मसी कॉलेजची इमारत कोविड केअर सेंटर साठी उपलब्ध करून दिली आहे. शासनाच्या माध्यमातून या इमारतीत कोविड केअर सेंटर सुरु करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांनी आज याठिकाणी भेट देत पाहणी केली. या कोविड केअर सेंटर मध्ये प्रथमतः ५० बेड तयार ठेवण्यात आले असून जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने उद्यापासून हे कोविड केअर सेंटर सुरू होण्यासाठी सज्ज आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने सिंधुदुर्गात बेडची कमतरता येत्या काळात भासू नये. लोकांना जवळच्या ठिकाणी चांगले उपचार मिळावेत यादृष्टीने आ.वैभव नाईक यांनी विजयराव नाईक फार्मसी कॉलेजच्या इमारतीत कोविड केअर सेंटर करण्यासाठी सहकार्य केले आहे.त्यांनी कोरोना रुग्णांना एकप्रकारे मदतीचा हात दिला आहे.
आज जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी याठिकाणी भेट देत कोरोना रुग्णांना आवश्यक असणारे स्वतंत्र बेड,जेवणाची, पाण्याची व्यवस्था, बाथरूम सुविधा, रुग्णांची ने आण करण्यासाठी अँब्युलन्स व्यवस्था, आरोग्य विभागाचे डॉक्टर,आरोग्य कमर्चारी यांची उपलब्धता,तसेच आवश्यक उपकरणे याबाबत आढावा घेतला. याठिकाणी वैद्यकीय स्टाफ नेमण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. इतर आवश्यक सोयीसाठी निधीची आवश्यकता असल्यास निधी देणार असल्याचे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.


यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसिलदार रमेश पवार,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ, पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिकलगार, नगरसेवक सुशांत नाईक, सरपंच महेश शिरवलकर,सतीश नाईक, भास्कर राणे,भूषण परुळेकर,छोटू पारकर,संदेश पटेल, प्रमोद सावंत, प्रा.मंदार सावंत आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 + nine =