You are currently viewing इंग्रजी माध्यम शाळेचा तो फलक अखेर उतरविला..

इंग्रजी माध्यम शाळेचा तो फलक अखेर उतरविला..

कुडाळ :

 

कुडाळ हायस्कूलच्या संस्था संचालकाचे इंग्लिश मीडियम स्कूल ला दिलेले नाव काढून टाकण्याची जोरदार मागणी नागरिक व पालकांनी केल्यानंतर शुक्रवारी दुपारी तो फलक संस्थेने शाळेच्या इमारतीवरून खाली उतरविला. तर इमारतीवरील नावाचा अन्य एक फलक प्लास्टिकने झाकण्यात  आला. कुडाळ हायस्कूलच्या संस्थेवरील उपाध्यक्ष डॉ. अनिल नेरूरकर यांनी संस्थेच्या महिला वसतिगृहात गैरवर्तन चालविल्याचा आरोप असलेल्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पत्रावरून गुरुवारी कुडाळ वासीय संतप्त झाले होते. आरोप असलेल्या संचालकाला संस्थेतून काढून टाकावे व हायस्कूलच्या इंग्लिश मीडियम स्कूल ला दिलेले त्यांचे नावही काढून टाकण्यात यावे अशा मागणीवर नागरिक ठाम राहिले होते. त्या नावाचे फलक कापडाने झाकण्याची संस्थेने मान्य केले होते. तसे पत्रही नागरिकांना दिले होते. त्यानुसार संस्थेने शुक्रवारी दुपारी ते शाळेच्या इमारतीवरून त्या संचालकाच्या नावाचा एक फलक खाली उतरविला. तरं हा फलक प्लास्टिक ने झाकण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 4 =