You are currently viewing सचिन जोईल मित्रमंडळ कातवण यांच्या वतीने कोविड लसीकरण मोहीम

सचिन जोईल मित्रमंडळ कातवण यांच्या वतीने कोविड लसीकरण मोहीम

देवगड

तालुक्यातील कातवण येथे सचिन जोईल मित्रमंडळाच्या वतीने कातवण येथे कोविड लसीकरण मोहीम राबविण्यात आली आहे, या दरम्यान ११० लोकांनीं या लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन लस घेतली आहे,
लसीकरण सेंटर वर होणारी गर्दी तसेच ऑफ लाईन लस घेताना काहींना लस न घेता घरी जावे लागत असल्याचे सर्वत्र चित्र आहे यात लोकांचा वेळ व वाहतूक प्रवास खर्च यामुळे लोकांना कोविड लस घेताना समस्या निर्माण होत आहेत या समस्या विचारात घेता कातवण गावातील ग्रामस्थांना गावात लस उपलब्ध करुन देण्यात आली आहे गावातील ११० ग्रामस्थांनी या लसीकरण मोहिमेत सहभाग घेतला असल्याची माहिती सचिन जोईल यांनी दिली आहे,

प्रतिक्रिया व्यक्त करा