You are currently viewing सिंधुदुर्ग सैनिक स्कूल मार्फत NDA परिक्षेच्या तयारीसाठी कॅश कोर्स सुरु : सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यासाठी सुवर्णसंधी :

सिंधुदुर्ग सैनिक स्कूल मार्फत NDA परिक्षेच्या तयारीसाठी कॅश कोर्स सुरु : सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यासाठी सुवर्णसंधी :

आंबोली :

सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट एक्स् सर्व्हिसमेन असो. च्या वतीने सिंधुदुर्गातील पहिले सैनिकी प्रशिक्षण देणारे स्कूल ब्रिगेडिअर सुधिर सावंत आणि श्री पिटर डॉन्टस यांच्या मार्गदर्शनाखाली आंबोली येथे सुरू करण्यात आले.
सिंधुदुर्गातील तरुणांना भारतीय सैन्यामध्ये अधिकारी बनण्याचे स्पप्न पूर्ण करता येण्यासाठी दि. ०१ एप्रिल ते दि. १५ एपिल २०२३ पर्यंत प्रशिक्षण शिविर आयोजित करण्यात आले आहे. NDA Crash Course सुरू करण्यात येत आहे. सिंधुदुर्ग सैनिक स्कूलच्या कॅम्पसचा उपयोग जिल्हयातील तरुणांना करून देण्यासाठी या कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे.

पंधरा दिवसाच्या या कॅश कोर्समध्ये विद्यार्थ्याना सैनिक स्कूलच्या तज्ञ शिक्षक प्राध्यापक यांचे मार्गदर्शन उपलब्ध होणार आहेच. त्याच बरोबर SSB (Staff Selcetion Board) मध्ये निवड होण्यासाठी त्यासंदर्भातील निवृत्त सैन्य अधिकारी यांचे देखिल मार्गदर्शन तासिकांचे आयेजन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्याना सैनिक स्कूलमधील सेवा-सुविधांचा उपयोग करून देण्याबरोबरच Obstacle Training Doubt Clearing Sessions चा सुध्दा कॅश कोर्समध्ये अंतर्भाव करण्यात आला आहे. Topic wise explanation, Full length Mock Test, Daily Current Affairs सोबतच Elearning ची सुविधा मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना या NDA Crash Course साठी प्रवेश घ्यावयाचा आहे त्यांनी सिंधदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीच्या मोबाईल नंबरवर संपर्क करून आपला प्रवेश निश्चित करावा.

http://forms.gle/QnUYetX2CY28jv586

या गुगल फॉर्म लिंकवर जाऊन आपला प्रवेश निच्छित करावा.
संपर्क क्रमांक – ९४२२०७३८४०.

या प्रशिक्षण शिबिरीला प्रवेश घेणा-या विद्यार्थ्याची राहण्याची, खाण्याची व्यवस्था सैनिक स्कूलमध्येच करण्यात आलेली आहे. हे प्रशिक्षण शिविर निवासी असेल याची नोंद घ्यावी.

सिंधुदुर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षण शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे संस्थापक ब्रिगेडिझर सुधिर सावंत सर आणि अध्यक्ष पि. एफ. डॉन्टस सर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven − 3 =