You are currently viewing भुईबावडा घाटासाठी दोन कोटींचा निधी मंजूर

भुईबावडा घाटासाठी दोन कोटींचा निधी मंजूर

रुंदीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा सुरू – आ नितेश राणे

वैभववाडी

भुईबावडा घाट दुरुस्तीसाठी सव्वा दोन कोटी मंजूर करण्यात आले आहेत. हा घाट मार्ग रुंदीकरण करण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा सुरु आहे. अशी माहिती आमदार नितेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
आमदार नितेश राणे यांनी भुईबावडा घाटाची पाहणी केली. दरडीचा मोठा भाग कोसळल्या ठिकाणी आमदार नितेश राणे यांनी पाहणी केली. तसेच घाटात शंभर मीटर अंतरावर भेग गेली आहे. त्या ठिकाणी पाहणी करत अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
या घाटाच्या संरक्षण कडे तसेच भिंतीकडे दुर्लक्ष करू नका. करूळ घाटाप्रमाणे हा देखील महत्त्वाचा घाट आहे. या घाटाचा उपयोग पर्यायी चांगला होत आहे. त्यामुळे या घाटाकडे विशेष लक्ष देणार घाट रुंदीकरणासाठी निधी उभा करणार असे यावेळी नितेश राणे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 + 11 =