You are currently viewing वेंगुर्ले बस स्थानकात सेवा शक्ति संघर्ष एस टी कर्मचारी संघटनेने उपोषण तिसऱ्या दिवशी घेतले मागे

वेंगुर्ले बस स्थानकात सेवा शक्ति संघर्ष एस टी कर्मचारी संघटनेने उपोषण तिसऱ्या दिवशी घेतले मागे

वेंगुर्ले बस स्थानकात सेवा शक्ति संघर्ष एस टी कर्मचारी संघटनेने उपोषण तिसऱ्या दिवशी घेतले मागे

वेंगुर्ले

वेंगुर्ले आगारातील वाहतूक निरीक्षक, सहाय्यक वाहतूक निरीक्षक यांच्यावर कारवाईसाठी सेवा शक्ति संघर्ष एस टी कर्मचारी संघ वेंगुर्ला आगारातर्फे १ मे रोजी सुरू करण्यात आलेले आमरण उपोषण आज तिसऱ्या दिवशी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी कळविल्याने भाजप चे तालुका अध्यक्ष पप्पू परब यांनी भेट घेऊन आपल्या मागण्या पूर्ण केल्या जातील असे आश्वासन दिल्याने हे उपोषण उपोषणकर्त्यांनी मागे घेतले आहे.

आपल्यावरील अन्यायाबाबत या उपोषणकर्त्यांनी महाराष्ट्र दिनापासून वेंगुर्ले बस स्थानकासमोर हे आमरण उपोषण सुरू केले होते. आज सकाळी एका उपोषणकर्त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान दुपारी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा तालुकाध्यक्ष पप्पू परब, माजी तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर तसेच सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी आपल्या मागण्यांची योग्य दखल घेण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा