You are currently viewing माजगाव सरपंचपदावर भाजपा महायुतीच्या रंजना कानसे यांचा विजय

माजगाव सरपंचपदावर भाजपा महायुतीच्या रंजना कानसे यांचा विजय

अपक्ष जयश्री सावंत यांचा १५८ मतांनी पराभव; ४०.११ टक्के मतदान नोंद

सावंतवाडी / माजगाव :

माजगाव ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदासाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत भाजपा महायुतीच्या रंजना रवींद्र कानसे यांनी अपक्ष उमेदवार जयश्री दिनेश सावंत यांचा १५८ मतांनी पराभव करून विजय मिळविला.

या निवडणुकीत एकूण ४०.११ टक्के मतदान झाले. गावातील ४१८५ मतदारांपैकी १६७९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ७८२ महिला मतदार तर ८९७ पुरुष मतदारांचा सहभाग होता.

मतमोजणीत रंजना रवींद्र कानसे यांना ८८२ मते मिळाली, तर जयश्री दिनेश सावंत यांना ७२४ मतांवर समाधान मानावे लागले. कमी मतदान असूनही ही निवडणूक चुरशीची ठरली असून, अखेरीस कानसे यांनी स्पष्ट आघाडी घेत विजय संपादन केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा