You are currently viewing स्थानिक खाकीच्या ग्रीन सिग्नल नंतर कोलगाव कुणकेरी तिठा आणि रेडी येथे पुन्हा बसली जुगाऱ्यांची बैठक

स्थानिक खाकीच्या ग्रीन सिग्नल नंतर कोलगाव कुणकेरी तिठा आणि रेडी येथे पुन्हा बसली जुगाऱ्यांची बैठक

*संवाद मीडियाच्या वृत्तानंतर दोन दिवस घेतली होती विश्रांती*

 

संवाद मीडियाच्या वृत्तानंतर दोन दिवस बंद असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव कुणकेरी तिठा आणि रेडी उषा नगर येथील बैठका आजपासून स्थानिक खाकी वर्दीचा ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर पुन्हा सुरू झाल्या.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुणकेरी तिठा, कोलगाव येथील एका घराच्या मागील बाजूला एकाच मंडपात एका बाजूला जुगाराची बैठक तर दुसऱ्या बाजूला गोवा बनावटीच्या दारूचा अड्डा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आजची सोमवारची बैठक ७.३० वाजता सुरू होऊन रात्री ११.३० पर्यंत चालणार असल्याची माहिती समोर येत आहे. बैठक लवकर आटोपती घेण्याचा मनसुबा केवळ एलसीबी वाल्यांची धाड पडण्याच्या भीतीपोटी आखल्याचे समजते. एलसीबीची गाडी ११२ नंबर वर कॉल गेला तर रात्री उशिरा पोचू शकते, त्यामुळे ११.३० पर्यंत बैठक आटोपती घेण्याचे ठरले आहे अशी सूचना दिली गेल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
रेडी येथील जुगाराची बैठक आज सायंकाळी सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून समजते. संवाद मीडियाच्या बातमीनंतर बंद असलेल्या बैठका दोन दिवसात सुरू झाल्याने स्थानिक खाकी वर्दी जिल्हा पोलिस प्रमुखांचा आदेश जुमानत नाही की काय…? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा पोलिस प्रमुख यावर काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − three =