You are currently viewing रेडी तेरेखोल रस्त्यावर “उ*” *नगरात खुलेआम जुगार*

रेडी तेरेखोल रस्त्यावर “उ*” *नगरात खुलेआम जुगार*

*गोव्यातील जुगारी आणि स्थानिक तरुणाईची गर्दी*

*स्थानिक खाकीची मर्जी पोलीस अधीक्षक अनभिज्ञ*

जिल्ह्यात खाकी वर्दीच्या आशीर्वादाने जुगार जोरदार सुरू असून जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या दुर्लक्षामुळे अवैध धंद्यांना पेव फुटले आहेत. वेंगुर्ला तालुक्यातील रेडी या खनिज संपत्तीने आर्थिक दृष्ट्या सुधारलेल्या गावात तेरेखोल रस्त्यावरील *”उ::”* नगर येथे खुलेआम जुगाराच्या मैफिली बसत असून स्थानिक खाकीचा त्यांना आशीर्वाद असल्याचे सूत्रांकडून समजते.
रेडी *”उ::”* नगर येथील बैठक ही “आ”बा “सा”सोलकर नामक व्यक्ती बसवत असून या बैठकीत एकूण २५ तक्षिमदार आहेत. गोवा राज्याच्या सीमेवर असल्याने गोव्यातील मोठमोठे जुगारी बैठकीला हजर असतात आणि रेडी गावातील डंपर आदी व्यवसायातून पैसे कमावणारी तरुणाई देखील आपले नशीब आजमावत होत्याचे नव्हते करून बसतात. रेडीतील जागृत ग्रामस्थ पोलीस कंट्रोल रूमला फोन करून तक्रार देतात परंतु आपल्या कर्तव्याला न जागता खाकी वर्दीतील शुक्राचार्य “आ”बा “सा”सोलकरला फोन करून अलर्ट करतात त्यामुळे पोलिसांची जीप तिथे जाते तेव्हा जागेवर काहीच सापडत नाही. जुगारी मात्र जागा बदलून आपला खेळ सुरू ठेवतात. त्यामुळे पोलीस अधिक्षकांचीच दिशाभूल केली जाते आणि स्थानिक खाकीच्या कृत्यापासून पोलीस अधीक्षक अनभिज्ञ राहतात. अशाच प्रकारे पोलीस अधीक्षकांना अंधारात ठेऊन कोलगाव आणि वेंगुर्ला तालुक्यातील रेडी जुगाराच्या बैठका बसतात.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिथे जिथे जुगार चालतात तिथे खाकी वर्दीला हाताशी धरून अवैध धंदे केले जातात. त्यामुळेच तरुणाई अवैध धंद्यांकडे ओढली जाते. राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात अशाप्रकारे अवैध धंदे सुरू असल्याने मंत्र्यांचा देखील पोलिसांवर वचक राहिला नाही का..? असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 + thirteen =