You are currently viewing आयडियाफोर्ज ह्या नागरी आणि संरक्षण क्षेत्रात कार्यरत कंपनीचे शेअर २६ जूनपासून सार्वजनिक विक्रीकरता उपलब्ध

आयडियाफोर्ज ह्या नागरी आणि संरक्षण क्षेत्रात कार्यरत कंपनीचे शेअर २६ जूनपासून सार्वजनिक विक्रीकरता उपलब्ध

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

मुंबई स्थित ड्रोन निर्माता कंपनी आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी यांनी आर्थिक वर्ष २०२२ मध्ये जवळपास ५०% मार्केट शेअरसोबत भारतीय मानवरहित विमान तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये उत्कृष्ट नेतृत्व करणारी बाजारातील एक अग्रणी कंपनी म्हणून नावलौकिक कमावला आहे. कंपनीने आपल्या पहिल्या सार्वजनिक ऑफरसाठी प्रति इक्विटी शेअर किंमत ₹६३८ ते ₹६७२ निर्धारित केली आहे. कंपनीचा हा सार्वजनिक “आईपीओ” प्रस्ताव प्राप्त करण्यासाठी सोमवार, २६ जून, २०२३ खुले होत आहे ते गुरुवार, २९ जून, २०२२ बंद होणार आहेत. गुंतवणूकदार २२ इक्विटी शेअर्सचा एक संच आणि त्यापुढे बोली लावू शकतात. प्रति इक्विटी शेअर ₹१० च्या अंकित मूल्यासह या सार्वजनिक गुंतवणूकीमधून ₹२४० करोडच्या नवीन गुंतवणूकीद्वारे ४,८६९,७१२ इक्विटी शेअर्स विक्रीसाठी समाविष्ट आहेत. या ऑफरमध्ये पात्र कर्मचार्‍यांसाठी राखीव कोटादेखील समाविष्ट आहे.

कंपनीने १५ जून, २०२३ रोजी आपल्या बँकर्सच्या सल्लाने संस्थेतील गुंतवणूकदारांकडून आईपीओ-पूर्व ₹६० करोड जमा केले. ज्यात टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स, ३६० वन स्पेशल अपॉर्च्युनिटीज फंड सिरिज ९ आणि १०, मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंड, आणि एक विदेशी गुंतवणूक संस्था – थिंक इन्व्हेस्टमेंट पीसीसी समभागी आहेत.

नवीन गुंतवणूकीद्वारे प्राप्त होणारे ₹५० करोड कंपनी कर्ज परतफेड / पूर्व परतफेडीसाठी, ₹१३५ करोड उपयोगशील भांडवलासाठी, ₹४० करोडचा उपयोग उत्पादन विकास आणि सामान्य वृद्धीच्या उद्दिष्टांमध्ये वापरला जाईल. कंपनी आईपीओच्या माध्यमातून ₹५५०.६९ करोड ते ₹५६७.२४ करोड जमा करण्याचं उद्दिष्ट बाळगत आहे.

आयडियाफोर्ज तंत्रज्ञानाला क्वालकॉम एशिया, इन्फोसिस, तसेच सेलेस्टा कॅपिटलसह अनेक सुप्रतिष्ठित उद्योगसमूह आणि खाजगी इक्विटी गुंतवणूकदारांचे समर्थन प्राप्त आहे. मॅथ्यू सायरियाक यांनी फ्लोरिंट्री एंटरप्रायझेस या कंपनीकडून एप्रिल २०२२ मध्ये कंपनीचे जवळजवळ ११.८५% शेअर्समध्ये गुंतवणूक झालेली आहे.

मुंबईस्थित कंपनीकडे संपूर्ण भारतात स्वदेशी मानवरहित एरियल व्हेइकल्स (युएव्ही) ची सर्वात मोठी श्रेणी आहे, तिच्याद्वारे निर्मित ड्रोन टेहळणी आणि मॅपिंगसाठी सरासरी दर पाच मिनिटांनी उड्डाण करतात. स्वतःचे ऑटोपायलट सब-सिस्टम आणि ग्राउंड कंट्रोल सॉफ्टवेअर आणि स्वतःचे पेलोड, कम्युनिकेशन सिस्टम आणि पॅकेजिंगचे पूर्ण-एकीकरण असलेले हे जगातील काही मूळ उपकरण उत्पादकांपैकी (“ओईएम”) एक आहे.

२००७ मध्ये स्थापन झालेल्या आणि पहिल्या पिढीतील उद्योजकांच्या नेतृत्वाखाली आयडियाफोर्जला फर्स्ट-टू-मार्केट फायदा मिळतो आणि त्यांनी प्रामुख्याने पाळत ठेवणे/निरीक्षण, मॅपिंग आणि सर्वेक्षणासाठी तयार केलेल्या अॅप्ससह ग्राहकांच्या गरजा पूर्ण केल्या आहेत. त्यांचे ग्राहक, सामान्य नागरिक ग्राहकां व्यतिरिक्त; सशस्त्र दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, राज्य पोलीस विभाग, आपत्ती व्यवस्थापन दल, वन विभाग इ. आहेत.

ड्रोन इंडस्ट्री इनसाइट्सने डिसेंबर २०२२ मध्ये प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, ड्रोन उद्योगातील एक दशकाहून अधिक अनुभवासह, कंपनी भारतातील ड्रोन मार्केटमध्ये प्रवेश करणार्‍या पहिल्या काही कंपन्यांपैकी एक आहे आणि दुहेरी-वापर विकसित करून श्रेणीतील म्हणजे नागरी आणि संरक्षण क्षेत्रांमध्ये जागतिक स्तरावर ७ व्या क्रमांकावर आहे. कंपनी बांगलादेश, व्हिएतनाम आणि नेपाळमध्ये आपला विस्तार करण्याची योजना आखत आहे.

कंपनीची स्थापना सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिप (“एसआयएनई”), आईआईटी मुंबई आणि त्यानंतर सीआईआईई इनिशिएटिव्ह, आईआईएम अहमदाबाद यांनी केली होती. १७ जून २०२३ पर्यंत, त्यांचे २५ पेटंट मंजूर होते आणि ३७ पेटंट मंजुरीच्या प्रतिक्षेत होते. कंपनी सध्या मिडल माईल ड्रोन बनवते, ज्यांचे वजन, सहनशक्ती, उड्डाणाची उंची, दळणवळण तसेच त्यांची वहन क्षमता भिन्न असतात. स्विच युएव्ही, नेत्रा व्ही४+ तसेच व्ही४ प्रो युएव्ही, क्यू६ युएव्ही, निन्जा युएव्ही, क्यू४आय युएव्ही आणि रायनो युएव्हीव ही आयडियाफोर्ज ड्रोनची काही उदाहरणे म्हणजे मानवरहित हवाई वाहने (युऐव्ही) ज्यांची संपूर्ण भारतभर अत्यंत भिन्न हवामानात वाळवंटापासून हिमनद्यांपर्यंत आणि उच्च शिखरांवर चाचण्या घेण्यात आल्या आहेत आणि २,००० हून अधिक सर्वोच्च तांत्रिकदृष्ट्या सुरक्षित लँडिंग पार पाडल्या आहेत. कंपनी आपल्या उत्पादनांची श्रेणी तांत्रिक युएव्ही आणि लास्ट माईल लॉजिस्टिक ड्रोनपर्यंत वाढवण्याची योजना आखत आहे.

मागील दोन आर्थिक वर्षांच्या तुलनेत, त्यांचा महसूल १६.६६% ने वाढला आहे, जो आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ₹१५९.४४ कोटी वरून २०२३ मध्ये ₹१८६.०१ कोटी झाला आहे, तर २०२३ मध्ये कर वजा केल्यानंतरचा नफा ₹३१.९९ कोटी आहे. जेएम फायनान्शियल लिमिटेड आणि आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड हे इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत आणि लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे रजिस्ट्रार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा