You are currently viewing बावळाट येथे श्री देवी सातेरी माउली कला क्रीडा व्यायाम मंडळाच्यावतीने भजन स्पर्धेचे आयोजन

बावळाट येथे श्री देवी सातेरी माउली कला क्रीडा व्यायाम मंडळाच्यावतीने भजन स्पर्धेचे आयोजन

ओटवणे / प्रतिनिधी :

बावळाट येथील श्री देवी सातेरी माउली कला-क्रीडा व्यायाम मंडळाच्यावतीने शनिवारी ३० एप्रिल रोजी ग्रामदैवत सातेरी माऊली मंदिरात खुल्या निमंत्रितांच्या भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या भजन स्पर्धेसाठी ९ भजन संघांना निमंत्रित करण्यात आले आहे.

या भजन स्पर्धेचे उद्घाटन सायंकाळी ६ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता ओंकार महिला भजन मंडळ (कोलवाळ गोवा) बुवा चैताली परब, सायंकाळी ७.४५ वाजता समाधी पुरुष भजन मंडळ (मळगाव) बुवा गौरांग राऊळ, रात्री ८ .३० वाजता रवळनाथ प्रसादिक भजन मंडळ (पाडलोस) बुवा अजित गावडे, रात्री ९.१५ वाजता मोरेश्वर प्रासादिक भजन मंडळ (नेरूर) बुवा भार्गव गावडे, रात्रौ १०.३०‌ वाजता श्री सद्गुरू प्रासादिक भजन मंडळ (तुळस) बुवा सिद्धेश नाईक, रात्रौ ११.१५ वाजता श्री दत्तकृपा प्रसादिक भजन मंडळ (वैभववाडी) बुवा विराज तांबे, रात्रौ १२.००‌ वाजता श्री सनाम देव प्रासादिक भजन मंडळ (सांगेली) बुवा खेमराज सनाम, रात्रौ १२.४५ वाजता श्री‌ सदगुरु भजन मंडळ (वडखोल) बुवा पुरुषोत्तम परब, रात्रौ १.३०‌ वाजता श्री राष्ट्रोळी प्रासादिक भजन मंडळ (दांडेली) बुवा बाबु गोडकर या भजन मंडळाचे सादरीकरण होणार आहे.

या भजन स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ५५५५ रुपये, द्वितीय पारितोषिक ३३३३ रूपये, तृतीय पारितोषिक २२२२ रूपये, उत्तेजनार्थ दोन पारितोषिके प्रत्येकी ११११ रूपये आणि सर्व विजेत्यांना आकर्षक सन्मानचिन्ह तसेच भजन स्पर्धेतील उत्कृष्ट गायक, हार्मोनियम वादक, पखवाज वादक, तबला वादक, झांज वादक, कोरस यांना रोख रकमेच्या पारितोषिकासह आणि सर्वांना आकर्षक सन्मान चिन्ह देण्यात येणार आहेत.

भजन स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्पर्धा संपल्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या भजन स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रसिद्ध गायक प्रकाश चिले आणि प्रसिद्ध पखवाज वादक आनंद मोर्ये आहेत. या भजन स्पर्धेचा भजन रसिकानी लाभ घ्यावा असे आवाहन श्री देवी सातेरी माऊली कला-क्रीडा व्यायाम मंडळाने केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 + 4 =