You are currently viewing बांदा-नाबर इंग्लिश मीडियमची चालू शैक्षणिक वर्षाची पालक सभा संपन्न…

बांदा-नाबर इंग्लिश मीडियमची चालू शैक्षणिक वर्षाची पालक सभा संपन्न…

बांदा

येथील व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम प्रशालेची चालू शैक्षणिक वर्षाची पालक सभा मोठ्या उत्साहात पार पडली.

पालक सभेची सुरवात दीप प्रज्वलनाने झाली. दहावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच अभ्यासक्रमातील विविध विषयात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष मंगेश कामत, सुधाकर डेगवेकर, श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सभेचे औचित्य साधून शिक्षक पालक संघाची स्थापना करण्यात आली. या संघासाठी नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांपैकी एक पालक प्रतिनिधी निवडण्यात आला. शिक्षक पालक संघाच्या उपाध्यक्षपदी सुनील राऊळ यांची निवड करण्यात आली. सर्व पालकांना महाराष्ट्र कॅडेट फोर्स या नवीन अभ्यासक्रमाची माहिती देण्यात आली.
मुलांच्या उज्वल भविष्यासाठी या कोर्स मध्ये सहभाग घेण्याचे सर्व पालकांना आवाहन करण्यात आले. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांची मुलगी मधुरा पाटील दहावीच्या परीक्षेत बांदा केंद्रात व प्रशालेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. सौ. श्रीया कशाळीकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले. शाळेला रक्कम रुपी मदत त्यांनी केली.
या सभेस श्री मंगेश रघुनाथ चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईचे अध्यक्ष मंगेश कामत, सौ श्रीया कशाळीकर, डॉ जगदीश पाटील, भाऊ वळंजू, सुरेश गावडे, शीतल राऊळ, मनोज कामत, गतवर्षीच्या पालक संघाच्या सदस्या सौ. अपर्णा सावंत, राजेश गोवेकर, शशी पित्रे, सुरेश गोवेकर आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन शाळेच्या उपमुख्याध्यापिका सौ. शिल्पा कोरगावकर यांनी केले. उपस्थित मान्यवरांचा परिचय सौ सुप्रिया पाटील यांनी करून दिला. प्रास्ताविक सौ. मनाली देसाई यांनी केले. आभार हेलन राॅड्रीग्ज यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 3 =