खारेपाटण चेकपोस्टवर दोन दिवसांत ​१८०हून अधिक प्रवाश्यांची तपासणी

खारेपाटण चेकपोस्टवर दोन दिवसांत ​१८०हून अधिक प्रवाश्यांची तपासणी

खारेपाटण :

सिंधुदुर्ग जिल्हा सीमा प्रवेशद्वार खारेपाटण चेकपोस्टवर कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर परजिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाश्यांची तपासणी शुक्रवार ​२६ मार्चपासून आरोग्य विभागाच्यावतीने आरोग्य पथक तैनात करून आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसात खारेपाटण चेकपोस्टवर जवळपास ​१८२ लोकांची तपासणी करण्यात आल्याचे समजते. शिमगोत्सव,​ ​होळी सण आल्याने दरवर्षीप्रमाणे मुंबईकर चाकरमानी किंवा परजिल्ह्यातून लोक आपल्या गावी येत असतात.​ ​त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव रोखण्याच्या हेतूने सिंधुदुर्ग जिल्हा सीमा प्रवेशद्वार खारेपाटण येथे नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येत आहे.

दरम्यान खारेपाटण चेकपोस्ट येथे दिनांक ​२६/०३/२०२१ पासुन ते दिनांक ​३१/०३/२०२१ पर्यंत आरोग्य पथक सकाळी ​८ ते ​२ व दु​.​ ​२ ते रात्री ​८ वाजेपर्यंत दोन सत्रात ठेवण्यात आले असून या आरोग्य पथकात CHO डॉ.​ ​प्रणव पाटील,​ ​डॉ.​ ​प्रशांत कानदे,​ ​CHOडॉ.​ ​धनश्री जाधव,​ ​CHO​ ​डॉ. तेजस्वी पारकर,आरोग्य सेवक सागर खोत,​ ​गणेश तेली हे अधिकारी व कर्मचारी काम करत असून पोलीस यंत्रणेकडून ही वाहनांची तपासणी होत आहे.
वाहनांची तपासणी करणे, कोणाला सर्दी​, ताप​,​ खोकला किंवा ​कोरोना संसर्गाची प्राथमिक लक्षणे आढळून आल्यास त्या व्यक्तीला जवळच्या प्राथमिक ​आरोग्य केंद्रात दाखल करणे​, सदर व्यक्ती कंटेन्मेंट झोन किंवा हॉटस्पॉट भागातून आली आहे का याची माहिती घेणे​,​ ट्रॅव्हल हिस्ट्री चेक करणे, थर्मल ग​न, प्लस ऑक्सिमिटरचा वापर करून प्रवाशांची तपासणी करण्याचे काम सध्या खारेपाटण चेकपोस्ट येथील आरोग्य पथकाकडून करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा