You are currently viewing आचरा येथील प्रसिद्ध कवी मंदार सांबारी यांना नक्षत्र गौरव पुरस्कार

आचरा येथील प्रसिद्ध कवी मंदार सांबारी यांना नक्षत्र गौरव पुरस्कार

मालवण :

 

पुणे येथील मानाचा समजला जाणारा नक्षत्र गौरव पुरस्कार आचरा येथील प्रसिद्ध कवी मंदार सांबारी यांना रविवारी पुणे येथील राज्यस्तरीय काव्य मैफिल स्पर्धेत नक्षत्रांचे देणे काव्यमंच राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांच्या सोबत मॉडर्न काॅलेज पुणे प्राचार्य राजेंद्र झुंझारराव, बालनाट्य चळवळ व ग्रंथपाल संघाचे माजी पदाधिकारी व परिक्षक शंकर घोरपडे, मुंबईच्या माजी प्राचार्या सौ.अलका नाईक, मुंबई-गोवा महामार्गाचे स्थापत्य अभियंता वसंत टाकळे; नक्षत्रांचे देणे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष व कवी उदय सर्पे तसेच महाराष्ट्रातील अनेक कवी आणि कवयित्री आदी उपस्थित होते. यावेळी मंदार सांबारी यांनी सादर केलेल्या “साॅग साॅग” या मालवणी कवितेने उपस्थितांची मने जिंकली.

प्रतिक्रिया व्यक्त करा