You are currently viewing उत्पादन शुल्काच्या कर्मचाऱ्यांवर बांद्यात विनामास्क दंडात्मक कारवाई..

उत्पादन शुल्काच्या कर्मचाऱ्यांवर बांद्यात विनामास्क दंडात्मक कारवाई..

बांदा :

बांदा बाजारपेठे शुक्रवारी विनामास्क फिरणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांवर बांदा पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. सरकारी कर्मचाऱ्यांवर नियमांप्रमाणे कारवाई करून बांदा पोलीस कर्मचारी चंद्रकांत देसाई आणि अमोल बंडगर यांनी समाजात एक आदर्श निर्माण केला असल्याची चर्चा बाजारपेठेत सुरू होती. बुधवार ते शुक्रवार तीन दिवस केलेल्या कारवाईत 39 जणांना 200 रुपये प्रमाणे 7 हजार 800 रुपये दंड ठोठावण्यात आला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी कडक करूनही दिवसाढवळ्या मात्र नागरिक पोलिसांना चकवा देत विनामास्क बिंदास खुलेआम फिरताना दिसून येतात. त्यामुळे कोरोनाचे गांभीर्य नागरिकांना नसल्याचे दिसून येत आहे. तसेच केवळ कारवाई करणार म्हणून  मास्क न लावता संसर्ग टाळण्यासाठी मास्क लावण्याचे आवाहन बांदा पोलिसांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 + five =