You are currently viewing सीमाभागातील मराठी संस्थांना अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार-आ.वैभव नाईक

सीमाभागातील मराठी संस्थांना अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार-आ.वैभव नाईक

आ. वैभव नाईक यांची बेळगाव येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाला भेट

१ नोव्हेंबर काळ्या दिनाच्या मुकफेरीला उपस्थित राहण्याचे दिले आश्वासन

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी  शनिवारी बेळगाव येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात भेट दिली. यावेळी शिवसेना पदाधिकारी व सीमावासियांतर्फे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व फेटा घालून त्यांचा सत्कार करण्यात आला.


यावेळी  आ.वैभव नाईक बोलताना म्हणाले,सीमाभागातील मराठी माणसाच्या भावना तीव्र आहेत.या भावनांची कदर करत १ नोव्हेंबर काळ्या दिनाच्या मुकफेरीला आपण उपस्थित राहणार आहोत.तसेच सीमाभागातील मराठी संस्थांना अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार त्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची लवकरच भेट घेणार असल्याची ग्वाही आ.वैभव नाईक यांनी दिली. तसेच शिवसेनेच्या माध्यमातून कै.आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित असलेला “धर्मवीर” हा चित्रपट सिमावासीयांना मोफत दाखविला जाणार आहे. बेळगाव मध्ये या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आले आहे.याबाबत शिवसेनेच्या पदाधिकऱ्यांसोबत आ.वैभव नाईक यांची चर्चा झाली.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, माजी महापौर शिवाजी सुंठकर, नरेश पाटील, तालुकाप्रमुख सचिन गोरले आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा