माजी पालकमंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांच्या आश्वासनानंतर अखेर ते उपोषण ७ व्या दिवशी सुटले

माजी पालकमंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांच्या आश्वासनानंतर अखेर ते उपोषण ७ व्या दिवशी सुटले

सावंतवाडी

बाजारपेठेतील ती जागा कायमस्वरूपी व्यवसाय करण्यासाठी देण्यात यावी आणि अनधिकृतपणे काढलेल्या स्टॉल वरून गेले ७ दिवस सावंतवाडी नगरपालिके समोर सुरू असलेले उपोषण अखेर माजी पालकमंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांच्या आश्वासनानंतर आज थांबवण्यात आले आहे.

माजी पालकमंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांनी आज उपोषण स्थळी भेट देत उपोषणकर्ते रवी जाधव यांच्याशी चर्चा केली. यावेळी आपण स्वतः नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी २९ जानेवारी रोजी बैठक घेऊन आपण योग्य तो निर्णय देऊ असे आश्वासन दिले आहे. यावेळी या बैठकीला रवी जाधव यांना देखील मुंबईला नेण्याची व्यवस्था आपण स्वतः करू असे देखील आश्वासन दिले आहे. त्यामुळे हे उपोषण ७ व्या दिवशी यशस्वी पणे सोडवण्यात आमदार दिपक केसरकर यांना यश आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा