You are currently viewing माटणेचे गणेश शिरोडकर यांना आदर्श कलारत्न पुरस्कार जाहीर

माटणेचे गणेश शिरोडकर यांना आदर्श कलारत्न पुरस्कार जाहीर

बांदा

माटणे (ता. दोडामार्ग) येथील युवा भजनी कलाकार गणेश शिरोडकर यांना ‘आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल कलारत्न पुरस्कार २०२२’ जाहीर झाला आहे. मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी, मुंबई या संस्थेकडून हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शिरोडकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

गणेश शिरोडकर हे श्री सातेरी पुरावतारी कला क्रीडा मंडळ माटणे या संस्थेची धुरा सांभाळत आहेत. श्री सातेरी पुरावतारी भजन मंडळाच्या माध्यमातून ते महाराष्ट्रासह गोवा राज्यातील भजन स्पर्धेत सहभाग घेतात. आतापर्यंत त्यांनी बर्‍याच वेळा उत्कृष्ट गायक पुरस्कार पटकाविला आहे.

भजन मंडळानेही सांघिक विविध क्रमांकांची पारितोषिके पटकाविली आहेत. सामाजिक तसेच भजन क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्थेने घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर केला आहे. गणेश शिरोडकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × two =